Author: Team Lok Bharti Live

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची रावेर तालुक्यातील विविध कामांना भेट,रात्रीच्या वेळी साधला नागरिकांशी संवाद घरकुल, आरोग्य, पाणीपुरवठा व शाळा व्यवस्थापनाबाबत दिल्या सूचना. जळगाव/प्रतिनिधी (दि. २०जून २०२६) :- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी शुक्रवार दि.१९ जून रोजी रावेर तालुक्यातील पेसा क्षेत्रात येणाऱ्या विविध विकासकामांना भेट देऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दर्जेदार कामाबाबत व आदिवासी पेसा क्षेत्रातील नागरिका सुविधांपासून वंचित राहू नयेत या दृष्टीने आवश्यक सूचना दिल्या.त्या सोबतच रात्रीच्या वेळी चावडी बैठक घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत चावडी बैठकीत उपस्थित झालेल्या समस्या तत्काळ सोडविण्याच्या सूचना दिल्या.या दौऱ्यादरम्यान करिश्मा नायर यांनी रावेर पंचायत समिती…

Read More

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जळगावात सामूहिक योगाभ्यास जळगाव दि.21 (जिमाका) : भारतीय संस्कृतीचा अमूल्य वारसा मानला जाणारा आणि निरोगी जीवनशैलीचा प्रभावी मार्ग ठरलेला योग आज जागतिक स्तरावर स्वीकारला गेला असून, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जळगावात विविध स्तरांवर उत्साहपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच ‘मेरा युवा भारत, जळगाव’ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या सभागृहात 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने, जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, माध्यमिक…

Read More

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक… जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांकडून नियमित योगाचा संकल्प.. जळगाव, दि. २१ (प्रतिनिधी)* : सहकाऱ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी जैन इरिगेशनतर्फे विविध कार्यशाळा, उपक्रम राबविले जातात. जागतिक योग दिनानिमित्त विशेष योगाभ्यासाचे नियोजन करण्यात आले होते. यात योगशिक्षिक सूर्यागिरीजी अर्थात सुभाष जाखेटे, योगशिक्षिका कमलेश शर्मा यांनी ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ या संकल्पनेच्या आधारावर योगाभ्यास करुन घेतला. ‘योग’, शरीर, मन आणि आत्म्याचा सुंदर संगम असून मनावर नियंत्रणासाठी योगसाधना केली पाहिजे सांगितेल. कंपनीच्या हजारो सहकाऱ्यांना नियमित योग, व्यायाम आणि व्यसनमुक्त जीवनशैली अंगीकारण्याचा संकल्प केला. अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती इंग्लीश मिडीअम मधील विद्यार्थ्यांचा नियमीत योग असतोच परंतू योगदिनानिमित्त विशेष सत्राचे आयोजन केले होते. जैन इरिगेशनच्या…

Read More

आ सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या वाढदिवसानिमित्त १००० गरजू व गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप संपन्न  जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार सुरेश दामू भोळे राजू मामा यांचा वाढदिवस दिनांक 13 जून रोजी अतिशय साध्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी साजरा केला होता  आ राजू मामांनी सर्व कार्यकर्त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने कुठल्याही प्रकारे जाहिरात होर्डिंग बॅनरबाजी न करता समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी वह्यादान करण्याचा आवाहन केले होते त्यानुसार भाजपचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी आमदार राजू मामा यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत 1000 वह्यांचे संकलन करण्यात आले होते त्याच अनुषंगाने आज मामा च्या वाढदिवसाचे औचित्य साधून 21 जून रविवार रोजी जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल भवन येथे सकाळी 10 वाजता कार्यक्रमाचे…

Read More

शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यावल तालुक्यातील सावखेडा सिम व डांभुर्णी येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे केले स्वागत जळगाव, दि. १५ जून २०२६ – उन्हाळी सुट्टीनंतर सोमवार दि. १५ जूनपासून जिल्हा परिषदेच्या शाळा पुन्हा सुरू झाल्या असून जिल्हाभरात उत्साहात शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सावखेडा सिम व डांभुर्णी येथील जिल्हा परिषद शाळांना भेट देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले.यावेळी लहानग्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने व उत्साहपूर्ण वातावरणात मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या निरागस स्वागताने त्या काही क्षणांसाठी…

Read More

पिवळ्या पट्ट्याबाहेर अतिक्रमण केल्यास हॉकर्सवर होणार थेट कारवाई: महापौर दीपमाला काळे जळगाव शहरातील नेताजी सुभाषबाबू चौकाने घेतला मोकळा श्वास जळगाव :शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि मुख्य बाजारपेठ परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेने कंबर कसली आहे. मंगळवारी संध्याकाळी महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, घाणेकर चौक ते प्रकाश मेडिकल चौकापर्यंतच्या परिसराची पायी चालत पाहणी केली. दोन दिवसांपूर्वीच मनपाच्या अतिक्रमण विभागाने येथील मोठे अतिक्रमण हटवून या चौकांना मोकळा श्वास करून दिला आहे. आता यापुढे या परिसरात शिस्त आणण्यासाठी हॉकर्स आणि पार्किंगसाठी पिवळे पट्टे आखून दिले जाणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश महापौरांनी दिले आहेत. या…

Read More

जळगावकरांसाठी दिलासादायक सुविधा अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे वरिष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सागर काकतकर यांची नियमित ऑर्थोपेडिक ओपीडी आता जळगावमध्ये जळगाव : दिनांक, १६, उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना त्यांच्या शहरातच अत्याधुनिक आणि तज्ज्ञ अस्थिरोग सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिकतर्फे जळगाव येथे नवीन ऑर्थोपेडिक परिघीय ओपीडी (Peripheral OPD) सुरू करण्यात येत आहे. या ओपीडीचे उद्घाटन आणि पत्रकार परिषद दि. १६ जून रोजी पियुष हॉस्पिटल, रिंग रोड, जळगाव येथे संपन्न झाली. या नव्या उपक्रमांतर्गत डॉ. सागर काकतकर, वरिष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ (Orthopedic Surgeon), अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक हे दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी दुपारी १२.०० ते ३.०० या वेळेत जळगाव येथे रुग्णांची…

Read More

सामाजिक संवेदनशीलतेचा सुंदर आविष्कार: ‘चेतना व्यसनमुक्ती केंद्रा’तर्फे हमाल बांधवांना उन्हापासून बचावासाठी साहित्याचे वाटप जळगाव: वाढत्या उन्हाचा तडाखा लक्षात घेता, समाजातील कष्टकरी घटकांप्रती संवेदनशीलता जपत जळगावच्या ‘चेतना व्यसनमुक्ती केंद्रा’ने एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. रेल्वे मालधक्क्यावरील हमाल बांधवांना उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या, ओआरएस (ORS) पावडर आणि रुमालांचे वाटप करण्यात आले. आज ३० एप्रिल रोजी भोईटे नगर परिसरातील रेल्वे मालधक्क्यावर हा कार्यक्रम पार पडला. रणरणत्या उन्हात दिवसभर शारीरिक कष्ट करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. याप्रसंगी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, नगरसेविका सौ. रंजनाताई वानखेडे आणि भाजपा कोषाध्यक्ष श्री. विजय वानखेडे यांच्या शुभहस्ते या…

Read More

माननीय महापौर सौ. दीपमालाताई काळे यांना महाराष्ट्र सुवर्णकार सेना, जळगाव जिल्हा यांच्या वतीने जळगाव शहरातील मुख्य चौकाला संत श्री नरहरी महाराज यांचे नामकरण करून त्या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्यात यावे, या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.जळगाव हे सुवर्णनगरी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत नरहरी महाराज यांच्या नावाने शहरातील प्रमुख चौकाचे नामकरण होऊन त्या ठिकाणी भव्य व आकर्षक स्मारक उभारण्यात यावे, अशी सर्व समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवर: सौ. रंजनाताई वानखेडे (नगरसेविका),श्री संजय विसपुते (जिल्हाध्यक्ष),श्री विजय वानखेडे(उपाध्यक्ष),श्री संजय पगार (सचिव),श्री बापू रणधीर,श्री श्याम भामरे,श्री बबलू बाविस्कर,श्री इच्छाराम दाभाडे,श्री विनोद दंडगव्हाळ,श्री पंकज रणधीर,श्री दीपक जगदाळे,श्री…

Read More

कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित युनिसेफ, जिल्हा परिषद, कृषी विज्ञान केंद्र आणि जैन इरीगेशन सिस्टीम्स लि. यांचा संयुक्त पुढाकार; ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न. जळगाव, दि.२५ प्रतिनिधी: – कापूस शेतीमध्ये कार्यरत असलेल्या गर्भवती महिला, स्तनदा माता आणि प्रजननक्षम वयोगटातील महिलांच्या आरोग्य व पोषणाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्ह्यात वात्सल्य प्लस हा सर्वसमावेशक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील महिलांना शेती कामकाजाच्या दरम्यान उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक धोक्यांपासून सुरक्षित ठेवणे, त्यांचे पोषण सुधारणा करणे आणि आरोग्यविषयक योग्य सवयी रुजवणे हे या उपक्रमाचे प्रमुख ध्येय आहे.युनिसेफच्या सहकार्याने महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत जळगाव…

Read More