टाळ-मृदुंगाच्या गजरात श्रीसंत नामदेव महाराजांचा ६७७ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७७ वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात आज दिनांक ११ ऑगस्ट मंगळवार रोजी श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित युवक व महिला मंडळ तसेच शहरातील संयोगी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदात भरून राजाच्या आगमनात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम समाज मंदिर येथील संत नामदेव मूर्तीचे व पालखीचे पूजन माजी महापौर सीमाताई भोळे यांनी केले. यानंतर पालखी सोहळ्याला सुंदर अशा बग्गीमधून व संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याला टाळ-मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या जयघोषात सुरुवात झाली. सदर पालखी सोहळा…
Author: Team Lok Bharti Live
जळगाव, दि.7 (जिमाका) : युवकांमधील वाढत्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी जिल्ह्यासाठी व्यापक कृती आराखडा तयार करण्यात येत असून, शाळा-महाविद्यालयांपासून गाव-वॉर्ड पातळीपर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यासाठी ‘माय भारत क्लब’, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायती, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग तसेच सामाजिक व आध्यात्मिक संस्थांनी सहभागी होऊन सर्वांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रिडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालयाच्या ‘नशामुक्त युवा विकसित भारत’ या राष्ट्रव्यापी अभियानाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज श्रीमती खडसे यांच्या अध्यक्षतेखाली दुरदृष्य प्रणालीद्वारे पूर्वतयारी संदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. यावेळी…
गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धी चा नावा मार्ग सत्य,अहिंसा, समता आणि सामाजिक न्यायाचा जागर जळगाव, दि. ७ (प्रतिनिधी)_ : सत्य, अहिंसा, समता, सेवा आणि स्वावलंबन या गांधीवादी मूल्यांना आधुनिक तंत्रज्ञान व उद्योजकतेची जोड देऊन समाजातील वंचित घटकांना सन्मानासोबत आर्थिक समृद्धी मिळवून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. हरिजन सेवक संघाच्या राष्ट्रीय परिषदेस जैन हिल्सला प्रारंभ झाला. यावेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून परिषदेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शंकरकुमार सन्याल तर जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन उद्घाटक होते. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा माजी…
स्वच्छ व हरित जळगावसाठी महापौर दीपमाला काळे यांचे नागरिकांना आवाहन जळगाव शहर महानगरपालिका, नाशिक येथील ‘हिरवांकुर संस्था’ आणि जळगावच्या ‘ग्रीन सिटी फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात येत्या १२ ते १६ ऑगस्ट दरम्यान विविध पर्यावरणपूरक उपक्रम व प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची सविस्तर माहिती देण्यासाठी आज, गुरुवारी महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषदेला संबोधित करताना महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले की, “हा महोत्सव केवळ एक प्रदर्शन नसून ही पर्यावरण संवर्धनाची एक मोठी चळवळ आहे. जळगाव शहर स्वच्छ आणि हरित राहावे यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या मोहिमेत सर्व जळगावकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा.”…
जैन फार्मफ्रेश फूड व नेस्ले यांच्या संयुक्त विद्यमाने ५०० स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड जळगाव दि. २ प्रतिनिधी- जैन फार्मफ्रेश फूड लि. आणि नेस्ले यांच्या (Responsible Sourcing Program) या सामाजिक उपक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी गांधी रिसर्च फाउण्डेशनच्या पुढाकाराने धरणगाव तालुक्यातील वंजारी या गावात ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा निर्धार केले. बकुळ, कडूलिंब, आपटा, बेल, बहावा, करंज सारख्या स्थानिक प्रजातींची झाडांच्या रोपांची लागवड ग्रामपंचायत परिसरासह सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक विद्यालयात करण्यात आले. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला शाळेचा परिसर हिरवागार करणे, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करणे तसेच पुढील पिढीमध्ये…
: जळगाव शहरातील प्रमुख रस्ते, समांतर रस्ते आणि नाल्यांवर अडथळा ठरणारे विद्युत रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर), वीज खांब व वाहिन्या त्वरित स्थलांतरित करण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर दालनात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. रस्त्यांमधील अडथळा ठरणारे खांब हटवण्यासाठी किंवा शिफ्ट करण्यासाठी पुढील दोन दिवसांत महापालिका आणि महावितरणचे अधिकारी संयुक्त पाहणी करतील. सर्व लोकेशनची पाहणी झाल्यानंतर तात्काळ खांब हटवण्याची कार्यवाही केली जाईल.वीज खांब व वाहिन्यांच्या स्थलांतरासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सहकार्य घेण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरात नव्याने तयार केलेल्या रस्त्यांवर तात्काळ पिवळे आणि पांढरे पट्टे मारावेत, असे निर्देश महापौरांनी दिले. रस्त्यांवर पट्टे मारण्याबाबत महापौर कार्यालयातून वारंवार स्मरणपत्रे पाठवूनही दुर्लक्ष…
जळगाव, (प्रतिनिधी) : देशाचा उज्ज्वल राष्ट्र युवक आणि प्रगतिशील नागरिक घडवण्यासाठी समाजात वाचन संस्कृती रुजणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांनी केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप जिल्हा कामगार आघाडीच्या वतीने रेमंड कॉलनी येथील महानगरपालिका शाळा क्रमांक ४५ मधील ६० विद्यार्थ्यांना राष्ट्रपुरुषांची पुस्तके, वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात बोलताना आमदार सुरेश भोळे पुढे म्हणाले की, महाराष्ट्राला प्रगतीच्या पथावर नेण्यासाठी आणि उज्ज्वल राष्ट्राच्या निर्मितीसाठी युवा पिढीने थोर राष्ट्रपुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेतली पाहिजे. त्यांची पुस्तके वाचल्यास विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या जीवनात निश्चितच सकारात्मक बदल घडून येईल. वाचन संस्कृतीमुळेच…
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार खानदेशात पहिल्यांदाच प्रयोग जळगाव (प्रतिनिधी): येथील अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटल अँड अँडव्हान्स्ड स्ट्रोक सेंटरमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक ‘सिल्क व्हिस्टा फ्लो डायव्हर्टर’ या तंत्रज्ञानाचा वापर करून मेंदूतील ‘अँन्युरिझम’ या अत्यंत गंभीर आजारावर यशस्वी उपचार करण्यात आले. प्रसिद्ध इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजिस्ट डॉ. निलेश किनगे व त्यांच्या टीमने खानदेशात पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णाला नवजीवन दिले आहे. रुग्णाला तीव्र डोकेदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे ‘एमआरआय’ आणि ‘डीएसए’ तपासणीदरम्यान रुग्णाच्या मेंदूतील मुख्य रक्तवाहिनीला मोठा फुगा (अँन्युरिझम) झाल्याचे निष्पन्न झाले. हा फुगा फुटल्यास मेंदूत तीव्र रक्तस्राव होऊन…
लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या अर्धकृती पुतळ्याचा उद्या जळगावात अनावरण सोहळा जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या विकासाचे शिल्पकार आणि खऱ्या अर्थाने लोकसेवक असलेले बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून उद्या, बुधवार दिनांक ८ जुलै २०२६ रोजी त्यांच्या अर्धकृती पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी, जळगाव यांच्या वतीने या सोळाव्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा अनावरण सोहळा जुना खेडी रोडवरील शंकरराव नगर येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या प्रांगणात सकाळी ११:०० वाजता संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे अनावरण भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषणजी गवई यांच्या शुभहस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश…
वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई -पालकमंत्री गुलाबरावपाटील चार हजारांहून अधिक वारकरी विशेष रेल्वेने पंढरपूरकडे रवाना; जी.एस. ग्राऊंड ते रेल्वे स्थानक भक्ती, शिस्त आणि समर्पणाचा अद्वितीय सोहळा पाळधी / जळगाव, दि. २७ (प्रतिनिधी) : यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची, समतेची आणि माणुसकीची जिवंत परंपरा आहे. विठ्ठलाच्या कृपेने गेल्या पाच वर्षांपासून हजारो वारकरी बंधू-भगिनींना पंढरपूर दर्शनाची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही आणि वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई आहे. या सेवेसाठी विठ्ठलाने मला केवळ निमित्त बनविले, हेच माझे खरे भाग्य…