Close Menu
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Lok Bharti Live
Button
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यावल तालुक्यातील सावखेडा सिम व डांभुर्णी येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे केले स्वागत
शैक्षणिक

शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यावल तालुक्यातील सावखेडा सिम व डांभुर्णी येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे केले स्वागत

Team Lok Bharti LiveBy Team Lok Bharti LiveJune 16, 2026Updated:June 16, 2026No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यावल तालुक्यातील सावखेडा सिम व डांभुर्णी येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे केले स्वागत

 

जळगाव, दि. १५ जून २०२६ – उन्हाळी सुट्टीनंतर सोमवार दि. १५ जूनपासून जिल्हा परिषदेच्या शाळा पुन्हा सुरू झाल्या असून जिल्हाभरात उत्साहात शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सावखेडा सिम व डांभुर्णी येथील जिल्हा परिषद शाळांना भेट देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले.यावेळी लहानग्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने व उत्साहपूर्ण वातावरणात मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या निरागस स्वागताने त्या काही क्षणांसाठी भारावून गेल्या.शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आकर्षण निर्माण व्हावे, शिक्षणाची गोडी लागावी आणि प्रवेशोत्सव संस्मरणीय व्हावा यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सजविलेल्या बैलगाडीवरून विद्यार्थ्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर स्वतः सहभागी झाल्या. मिरवणूक शाळा परिसरात आल्यानंतर विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले.चिमुकलीने घेतली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मुलाखसावखेडा सिम येथील शाळेत प्रवेशोत्सवानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या कु. कोमल सोनवणे हिने मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची मुलाखत घेण्याची इच्छा व्यक्त केली. नायर यांनी तत्काळ होकार देत तिच्या उत्साहाला प्रोत्साहन दिले. कोमलने स्वतःच्या हस्ताक्षरात प्रश्न तयार करून अत्यंत आत्मविश्वासाने मुलाखत घेतली. तिच्या या धाडसी प्रयत्नाचे उपस्थितांनी कौतुक केले.कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी सादर केलेल्या आदिवासी नृत्यालाही उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण, केंद्रप्रमुख विजय ठाकूर, मुख्याध्यापक संदीप पाटील, शिक्षक नामदेव सूर्यवंशी, आशा तडवी, धीरज तायडे, पुष्पा तायडे, निखिल संभे, शिवाजी रोहनकर, आशिष भैसारे, अमोल राऊत तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मीना तडवी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share. WhatsApp Facebook Twitter Tumblr
Team Lok Bharti Live

Related Posts

देशातून दुसरा आयुष भामरे यांस प्रज्ञावंत नंदुकुमार बेंडाळे यांच्या कडून 5000रु पुरस्कार जाहीर

October 26, 2025

कुमार उज्वल गवळीची राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड

October 26, 2025

2004च्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा मेळावा

October 26, 2025
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.