Author: Team Lok Bharti Live

पर्यावरण संतुलन,सकल हिंदुराष्ट्राच्या उन्नती करिता गोरक्षण काळाची गरज पूज्य साध्वी कपिला दीदी… शुक्रवार,गोसेवार्थ छप्पन भोग जळगाव — शहरातील पांजरापोळ संस्थेत भव्य अलौकिक गौकथेचे दिनांक 11 ते 15 नोहेंबर दरम्यान दुपारी 03 ते सायंकाळी 06 वाजेदरम्यान पाच दिवसीय भव्य आयोजन करण्यात आले असून आज तिसऱ्या दिवशी *गोमातेला सुंदर चुनरी* देऊन विशेष सन्मान करण्यात आला. या प्रसंगी असंख्य उपस्थित भाविकांन समोर पूज्य साध्वी कपिला गोपाल सरस्वती दीदी यांनी देव लोक आणि भारतीय संस्कृतीत सर्वात श्रेष्ठ गोसेवाच असल्याचे सांगून पुराणातील दाखले देऊन उद्बोधन केले.तर पर्यावरण संतुलन,सकल हिंदुराष्ट्राच्या उन्नती करिता गोरक्षण काळाची गरज असून शारीरिक व्याघी असलेल्या गाईंची सेवा करणाऱ्यास परम पुण्याची सहज प्राप्ती…

Read More

आज दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ मराठी 🎭 रंगभूमी दिनानिमित्त सर्व रंगकर्मीनी “बालगंधर्व खुले नाट्यगृह” येथे रंगदेवता नटराज तसेच तबला ,पेटी आणि रंगरंगोटी पेटी ( मेकअप बॉक्स) पूजन करून नारळ ज्येष्ठ रंगकर्मी श्री चिंतामण पाटील सर (मास्तर) यांनी वाढवला प्रसंगी रंगदेवतेला वंदन करत डॉ.उल्हास कडूस्कर लिखित शब्द सुरांच्या रेशीम गाठी या नाटकातील नांदी खान्देश नाट्य प्रतिष्ठानचे दुष्यंत जोशी, संजय कुलकर्णी यांनी गात सर्व रंगकर्मीनी नांदीने वंदन करत तबल्यावर मोहन रावतोळे , संवादिनीवर भुषण खैरनार यांनी साथसंगत दिली सोबत सर्व रंगकर्मी ……….. सोबत होते याप्रसंगी जेष्ठ रंगकर्मी पीयुष रावळ,विनय काबरा सर , संजय निकुंभ,चंद्रकांत अत्रे, गुलाब शेख, चंद्रकांत चौधरी, अरुण सानप,शरद पांडे,…

Read More

*विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेसाठी साठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती* *जळगाव दि.५ प्रतिनिधी* – जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (ए आय सी एफ) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गोवा शासनातर्फे पुरस्कृत विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन दोन दशकानंतर भारतात होत आहे. ३१ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा होईल. या जागतिक बुद्धिबळपटूंसाठी आकर्षण केंद्र असलेल्या स्पर्धेत जळगाव येथील जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे यांना (सामना पंच) सहाय्यक पंच म्हणून नियुक्त केले आहे. ही नियुक्ती जागतिक बुद्धिबळ संघटनेने (फिडे) यांनी केली आहे. प्रवीण ठाकरे यांनी यापूर्वी अनेक राज्य, राष्ट्रीय, आशियाई…

Read More

जळगावात अशोक लेलँडच्या ‘अयांश ऑटोमोबाईल्स’ या नव्या शोरूमचे भव्य उद्धघाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ची विशेष उपस्थिती लाभणार ! जळगाव, दि. २९ ऑक्टोबर :* शहरात हिंदूजा समूहाच्या अशोक लेलँडचे जळगावचे अधिकृत सेल्स व सर्व्हिस पॉईंट म्हणून ‘अयांश ऑटोमोबाईल्स’ या अत्याधुनिक लाईट कमर्शियल व्हेइकल्स शोरूमचे भव्य उद्घाटन उद्या गुरुवारी, ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. अशोक लेलँड लिमिटेडचे LCV प्रमुख श्री. विप्लव शाह यांच्या शुभहस्ते हा शानदार सोहळा संपन्न होणार असून, कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणून महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची सुद्धा विशेष उपस्थिती लाभणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला शहरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.एमआयडीसी परिसरातील मारुती…

Read More

नोडा मुंबई संस्थेद्वारा 100 प्रज्ञाचुक्ष व दिव्यांग बांधवांना दिवाळी फराळ भेट वस्तू वाटप जागतिक पांढरी काठी दिनानिमित्ताने तसेच दिवाळीनिमित्त आज दिनांक 26 ऑक्टोबर रविवार रोजी दुपारी 2 वा इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव येथे मुंबई नोडा संस्थेद्वारा जिल्ह्यातील शंभर प्रज्ञाचूक्ष व दिव्यांग बांधवांना आज दिवाळीचा फराळ व भेट वस्तु वाटप करण्यात आला कार्यक्रमा साठी जलसंपदा मंत्री मा ना गिरीश भाऊ महाजन जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा जैन उद्योगाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ केतकी ताई पाटील श्री साई संस्थान अध्यक्ष सुनील भाऊ झवर उद्योजक सागर चौबे यांच्या अनमोल सहकार्याने दिवाळीचा फराळ, स्टीलचा डबा, ड्रायफ्रूट, मिठाई, वाटप…

Read More

औट्रम घाटात ५.५० किमी लांबीच्या बोगद्याला केंद्र सरकारची मंजुरी – खासदार स्मिता वाघ ₹२,४३५ कोटींच्या प्रकल्पाला हिरवा कंदील; मराठवाडा आणि खान्देशातील वाहतूक होणार अधिक सुरक्षित आणि सुलभ जळगाव, दि. २६ ऑक्टोबर :धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील औट्रम घाट हा राज्यातील सर्वात अवघड आणि धोकादायक घाट म्हणून ओळखला जातो. अनेक वर्षांपासून या घाटावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अपघात, वाहतूक कोंडी आणि विलंबाचा सामना करावा लागत होता. आता या घाटावरून प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने ५.५० किलोमीटर लांबीच्या अत्याधुनिक बोगद्याच्या बांधकामास मंजुरी दिली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर सुमारे ₹२,४३५ कोटी खर्च होणार असून, टेलवाडी ते बोधरे या सुमारे १५ किलोमीटरच्या टप्प्यात…

Read More

महाराणा प्रताप विद्यालयात २३ वर्षा नंतर एकत्रआले वर्गमित्र जळगांव शहरातील प्रेम नगर येथिल महाराणा प्रताप विद्यालयतील २००२ मध्ये दहावी उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थीचा स्नेहमेळावा शनिवारी प्रेम नगरातील महाराणा प्रताप विद्यालयात पार पडला २३ वर्षानी एकत्र जमलेल्या वर्ग मित्रांनी जुन्या आठवणीनां उजाळा दिला दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात सारे रमुन गेले होते. माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात विद्यालयाच्या सुमारे ७० माजी विद्यार्थीनी खावेळी हजेरी लावली होती २३ वर्षा नंतर भेट झाल्यावर काहीना चेहरे ओळखीचे तर काहीनां अनओळखी भासले नंतर परिचय देऊन शाळेतील आठवणी परस्परांच्या वाटचालीबद्दल गप्पा गोष्टी, खेळ आदी कार्यक्रमांना दिवसभर रमुन गेले होते. सर्वांनी स्नेह भोजनाचा आनंद घेतला विद्यालयातील मुख्यध्यापिका शर्मा मॅडम…

Read More

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा आयुष भामरे देशातून द्वितीयके.सी.ई. संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांच्याकडून ₹५०००/- चा विशेष पुरस्कार जाहीर जळगाव -के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता १२वी (विज्ञान शाखा) विद्यार्थी आयुष महेंद्र भामरे याने नुकत्याच झालेल्या भारतीय ज्ञान परंपरा (संस्कृत) ऑलिम्पियाड २०२५ मध्ये राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून अभूतपूर्व यश संपादन केले आहे.या यशाच्या पार्श्वभूमीवर के.सी.ई. संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांनी आयुष भामरेला ₹५०००/- चा विशेष पुरस्कार जाहीर करून त्याचा गौरव केला.प्रज्ञावंत बेंडाळे सर म्हणाले,“आयुष भामरेने राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश आमच्या संस्थेसाठी अभिमानाचा क्षण आहे. संस्कृत आणि भारतीय ज्ञान परंपरेसारख्या समृद्ध विषयात आजच्या तरुण पिढीकडून…

Read More

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा कुमार उज्वल गवळीची राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड जळगांव- क्रीडा युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक ,जिल्हा परिषद नाशिक, यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय विभाग स्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले होते यात खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या 19 वर्षाखालील उज्वल ललित गवळी यांनी सहभाग घेऊन त्यामध्ये कास्यपदक प्राप्त केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालीराज्यस्तरीय स्पर्धा 26 ऑक्टोबर ते 28 सप्टेंबर 2050 नागपूर येथे होणार आहेत.उज्वल ललित गवळी या खेळाडूंला क्रीडाशिक्षक डॉ. रणजीत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कुमार उज्वल गवळी यांचे संस्थाध्यक्ष प्रज्ञावंत आदरणीय…

Read More