आ सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या वाढदिवसानिमित्त १००० गरजू व गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप संपन्न

जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार सुरेश दामू भोळे राजू मामा यांचा वाढदिवस दिनांक 13 जून रोजी अतिशय साध्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी साजरा केला होता
आ राजू मामांनी सर्व कार्यकर्त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने कुठल्याही प्रकारे जाहिरात होर्डिंग बॅनरबाजी न करता समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी वह्यादान करण्याचा आवाहन केले होते त्यानुसार भाजपचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी आमदार राजू मामा यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत 1000 वह्यांचे संकलन करण्यात आले होते त्याच अनुषंगाने आज मामा च्या वाढदिवसाचे औचित्य साधून 21 जून रविवार रोजी जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल भवन येथे सकाळी 10 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी,खा स्मिताताई वाघ महापौर दिपमाला ताई काळे, स्थायी समिती सभापती डॉ चंद्रशेखर पाटील भाजप प्रदेश सदस्य संतोष इंगळे ,व नगरसेवक पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थिती वह्या वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे संयोजक मिलिंद गोविंद चौधरी व उदय जी भालेराव हे होते जळगाव शहरातील महानगरपालिकेच्या 1000 विद्यार्थ्यांना वह्या व दप्तर वाटप करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाजप सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळें, जयेश भावसार, प्रकाश पंडित मंडळ अध्यक्ष आनंद सपकाळे, अजित राणे, विनोद मराठे, अतुल बारी, नगरसेवक व भाजपच्या विविध आघाडीचे अध्यक्ष व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला जळगाव शहरातील असंख्य विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्याच्या लगेच वह्या व दप्तर मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदीत फुलून आल्याचे दिसत होते व सर्वांनी राजू मामांना वाढदिवसाच्या शुभेच्छा या प्रसंगी टाळ्या वाजवून दिल्या
