Close Menu
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Lok Bharti Live
Button
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Home»जळगाव»लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या अर्धकृती पुतळ्याचा उद्या जळगावात अनावरण सोहळा
जळगाव

लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या अर्धकृती पुतळ्याचा उद्या जळगावात अनावरण सोहळा

Team Lok Bharti LiveBy Team Lok Bharti LiveJuly 7, 2026No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या अर्धकृती पुतळ्याचा उद्या जळगावात अनावरण सोहळा

 

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या विकासाचे शिल्पकार आणि खऱ्या अर्थाने लोकसेवक असलेले बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून उद्या, बुधवार दिनांक ८ जुलै २०२६ रोजी त्यांच्या अर्धकृती पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी, जळगाव यांच्या वतीने या सोळाव्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा अनावरण सोहळा जुना खेडी रोडवरील शंकरराव नगर येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या प्रांगणात सकाळी ११:०० वाजता संपन्न होणार आहे.
या सोहळ्याचे अनावरण भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषणजी गवई यांच्या शुभहस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ असणार आहेत. याप्रसंगी केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे, माजी मंत्री तथा विधानपरिषद सदस्य आ. एकनाथराव खडसे आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्याला जळगाव शहराचे आमदार आ. राजूमामा भोळे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य आ. सत्यजित पाटील, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, जळगाव शहराच्या महापौर सौ. दीपमाला काळे, आणि क.ब.चौ.उ.म.वि. जळगावचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी तसेच माजी कुलगुरू प्रा. एन. के. ठाकरे, प्रा. के. व्ही. पाटील, प्रा. आर. एस. माळी, मा. प्रा. शिवाजीराव पाटील आणि मा. प्रा. पी. पी. पाटील हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे यजमान तथा धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष शिरीष मधुकरराव चौधरी यांच्यासह संस्थेचे सचिव प्रा. डॉ. पी. आर. चौधरी, उपाध्यक्ष श्री. सुनील पाटील, खजिनदार श्री. निळकंठ काळे, सहसचिव श्री. पुरुषोत्तम पाटील व सर्व संचालक मंडळाने या सोहळ्याला आणि लोकसेवकाच्या स्मृतींना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Tumblr
Team Lok Bharti Live

Related Posts

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची रावेर तालुक्यातील विविध कामांना भेट,

June 21, 2026

जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांकडून नियमित योगाचा संकल्प..

June 21, 2026

आ. सुरेश भोळे यांच्या वाढदिवसा निमित्त वह्या वाटप

June 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.