Author: Team Lok Bharti Live

मुंबईतील नंदवन येथे आज भुसावळच्या राजकारणाला नवे वळण मिळाले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर आणि विचारांवर विश्वास ठेवत प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी, भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. गायत्रीताई भंगाळे आणि निखिल संतोषभाऊ चौधरी यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. भुसावळ आणि जळगावच्या विकासासाठी मोठी राजकीय ताकद उभी करणे, शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करणे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक ताकदीने काम करणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे मानले जात आहे. या नव्या राजकीय वाटचालीत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते मा. गुलाबरावजी पाटील साहेब, पाचोरा आमदार किशोरअप्पा पाटील, आमदार बच्चूभाऊ कडू, चोपडा आमदार…

Read More

जळगाव, दि. ०१ प्रतिनिधी : नारीशक्तीचा जागर, साहसाचा थरार आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा जल्लोष… अशा अनोख्या संगमातून ‘युवतींची दहीहंडी २०२६’ येत्या शनिवार, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत शिवतीर्थ मैदान (जी. एस. ग्राउंड), जळगाव येथे रंगणार आहे. त्या पार्श्वभूमीवर युवतींच्या दहिहंडी उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांची भेट घेतली. दहिहंडी उत्सव समितीच्या नियोजना विषयी या बैठकीत चर्चा झाली. जैन हिल्स येथे झालेल्या बैठकीप्रसंगी समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सीमा पाटील, उपाध्यक्ष उषा जैन, कार्याध्यक्षा डॉ. सोनाली महाजन, स्वागत समिती प्रमुख डॉ. कल्याणी नागूलकर व सचिव प्रा. क्षमा सराफ,…

Read More

जळगाव शहराच्या सहकार क्षेत्रात आज एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. बुलढाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या भव्य व दिमाखदार वास्तूत बुधवारी दिनांक २६ रोजी स्थलांतर सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांच्या शुभहस्ते या नव्या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. सहकार क्षेत्रातील विश्वासार्हतेचे प्रतीक असलेल्या बुलढाणा अर्बनच्या या नव्या टप्प्याचे साक्षीदार होण्यासाठी अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती बुलढाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुकेशजी झंवर, आ. राजूमामा भोळे, आ. किशोर पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, पाचोरा एज्युकेशन सोसायटी चे चेअरमन सुभाषजी तोतला हे उपस्थित होते. नव्या स्वमालकीच्या वास्तूमुळे आता…

Read More

जळगाव : ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित आर. आर. विद्यालय, जळगाव येथे दिनांक २७ ऑगस्ट 2026, गुरुवार रोजी रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांच्या मनगटावर राख्या बांधून भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व सांगणारी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, स्नेह, आपुलकी, बंधुभाव व सामाजिक बांधिलकीची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमास विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री. डी. बी. पांढरे सर, गाईड शिक्षिका श्रीमती आर. जे. लांबोळे मॅडम,व सौ. एस. ए. साळी मॅडम,स्काऊट शिक्षक श्री. के. आर. वंजारी सर आदी शिक्षक उपस्थित होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाच्या…

Read More

२६ ऑगस्टला भव्य कार्यक्रम; सहकार क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती जळगाव | प्रतिनिधी : सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या जागेतील स्थलांतर सोहळा बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. जळगाव शहरातील प्रतापनगर,जवळ ढाके कॉलनी गणेश कॉलनी रोडवरील राजश्री शाहू कॉम्प्लेक्ससमोरील ‘बुलडाणा अर्बन भवन’ येथे या स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर होणार आहे. या सोहळ्यास बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक (भाईजी),बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. सुकेशजी झंवर , बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा सौ. कोमलताई झंवर व पाचोरा एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष सुभाषजी तोतला, यांची…

Read More

साने गुरूजी निवासी माध्यमिक विद्यालय जिल्हास्तरावर, श्रीमती प्र. अ. सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल तालुकास्तरावर तर अ. ध. चौधरी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ग्रामीणस्तरावर प्रथम जळगाव, दि. २३ (प्रतिनिधी) : सत्य, अहिंसा, धर्म,  प्रेम आणि शांती हे फक्त बोलण्यापुरते मर्यादित नसावे ते कृतीतून आचरणात आणावे. जगण्यातून अनुभवाला येते ते सत्य, निसर्गाप्रतीची संवेदनशीलता ही अहिंसा, कर्तव्यातून दिसतो तो धर्म, अपेक्षेशिवाय केले जाते ते प्रेम आणि सर्वांचा संगम जेथे असतो तेथे शांती असते, असे प्रतिपादन अप्पासाहेब पटवर्धन सफाई आणि पर्यावरण तंत्र निकेतन, देहू, पुणेच्या संचालिका डॉ. शिल्पा नारायणन यांनी व्यक्त केले. गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धा २०२५-२६’ मधील…

Read More

भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांचा वाढदिवसानिमित्त गो शाळेत गाईंना चारा ,लापशी खाऊ घालून साजरा सर्वसामान्य कार्यकर्ता,ते जिल्हाध्यक्ष ज्यांनी आपल्या कुशल संघटन व कार्य तत्परतीची छाप भारतीय जनता पक्षात निर्माण केलेले भाजप जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांचा आज 22 ऑगस्ट रोजी भाजप जिल्हा व्यापार आघाडी महानगराच्या वतीने पांझरा गोशाळा येथे गाईंना लापशी चारा खाऊ घालून त्यांचा वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे राजू मामा माजी आमदार चंदूभाई पटेल व्यापारा गाडीचे अशोक राठी ,जिल्हाध्यक्ष विनय बाहेती ,भाजप जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी मिलिंद चौधरी पितांबर भावसार मनोज भांडारकर ,नगरसेवक डॉ विरेन खडके, प्रदीप रोटे ,संतोष इंगळे ,विजय वानखेड व्यापार…

Read More

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला आज नवी दिशा आणि नवा वेग मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रेरणेने, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे आमदार मंगेशदादा चव्हाण विकासाची गंगा चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात आणत आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना, निधी आणि विकासकामांचा लाभ चाळीसगावच्या जनतेला मिळवून देण्यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण सातत्याने पाठपुरावा करत आहेत. आपल्या प्रत्येक भाषणात आणि संवादात मंगेशदादा हे आवर्जून सांगतात की, “मोदीजींची प्रेरणा, फडणवीस साहेबांचे नेतृत्व आणि गिरीशभाऊ महाजन यांचे मार्गदर्शन व भक्कम पाठबळ यामुळेच चाळीसगावच्या विकासाची ही मोठी कामे करणे शक्य होत आहे.” यातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे…

Read More

जळगाव : राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे नेते ना. गिरीश भाऊ महाजन यांची नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर जळगाव शहरात प्रथम आगमन होताच त्यांचे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या वतीने प्रचंड उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले.  रेल्वे स्थानक परिसरात गिरीश भाऊंच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. गिरीश भाऊंचे आगमन होताच घोषणांनी परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांचा उत्साह, पुष्पवृष्टी आणि जल्लोषामुळे रेल्वे स्थानक परिसर अक्षरशः उत्सवस्थळ बनला होता. यावेळी जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते गिरीश भाऊ महाजन यांना भव्य गुलाबहार घालून नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. उपस्थित…

Read More

मेहरूण तलावात गटारीचे पाणी जाणार नाही! प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना; गणपती विसर्जनापूर्वी दोन पंपहाऊस सुरू करण्याचे आदेश जळगाव शहराचे वैभव आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा जलस्रोत असलेल्या मेहरूण तलावात गटारीचे सांडपाणी जाणार नाही, यासाठी तातडीने ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले. मेहरूण तलावाच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीरपणे घेत आज उपमहापौर मनोज सुरेश चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील तसेच प्रभाग १३ मधील नगरसेवक नितीनभाऊ सपके, नगरसेविका वैशालीताई पाटील, नगरसेवक अमरकाका जैन व नगरसेवक डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. मेहरूण तलावात शहरातील एक-दोन नव्हे तर तब्बल १६ ड्रेनेज लाईनचे सांडपाणी सोडले जात असल्याचा मुद्दा बैठकीत…

Read More