Close Menu
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Lok Bharti Live
Button
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Home»जळगाव»जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
जळगाव

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

Team Lok Bharti LiveBy Team Lok Bharti LiveJuly 22, 2026No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

खानदेशात पहिल्यांदाच प्रयोग

​जळगाव (प्रतिनिधी): येथील अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटल अँड अँडव्हान्स्ड स्ट्रोक सेंटरमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक ‘सिल्क व्हिस्टा फ्लो डायव्हर्टर’ या तंत्रज्ञानाचा वापर करून मेंदूतील ‘अँन्युरिझम’ या अत्यंत गंभीर आजारावर यशस्वी उपचार करण्यात आले. प्रसिद्ध इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजिस्ट डॉ. निलेश किनगे व त्यांच्या टीमने खानदेशात पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णाला नवजीवन दिले आहे.

​रुग्णाला तीव्र डोकेदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे ‘एमआरआय’ आणि ‘डीएसए’ तपासणीदरम्यान रुग्णाच्या मेंदूतील मुख्य रक्तवाहिनीला मोठा फुगा (अँन्युरिझम) झाल्याचे निष्पन्न झाले. हा फुगा फुटल्यास मेंदूत तीव्र रक्तस्राव होऊन अर्धांगवायू किंवा जीवितास धोका निर्माण झाला असता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉ. निलेश किनगे यांनी कोणतेही ओपन ब्रेन सर्जरी न करता केवळ मांडीच्या धमनी द्वारे मेंदूत पोचून ‘सिल्क व्हिस्टा फ्लो डायव्हर्टर स्टॅट बसवून’ यशस्वीरीत्या आधुनिक न्यूरो इंटरनॅशनल शस्त्रक्रिया केली. अत्याधुनिक स्टेंटमुळे रक्ताचा प्रवाह फुग्यामध्ये न जाता थेट मुख्य रक्तवाहिनीतून सुरू झाला, ज्यामुळे अँन्युरिझमचा फुटून रक्तस्राव होण्याचा धोका पूर्णपणे टळला या उपचारानंतर रुग्ण पूर्णपणे सुखरूप असून आज डिस्चार्ज देण्यात आला. या या पूर्ण प्रोसिजरमध्ये डॉक्टर विनोद किंनगे भूलतज्ञ यांचे अमूल्य सहकार्य लाभले. खान्देशातच अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय दर्जाची न्यूरो-इंटरव्हेंशनल सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांना आता मुंबई, पुणे किंवा नागपूरसारख्या दूरच्या शहरांत जाण्याची गरज नाही, असे मत डॉ. निलेश किनगे यांनी व्यक्त केले. रुग्णाच्या नातेवाइकांनी डॉ. किनगे व अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलच्या वैद्यकीय टीमचे मनःपूर्वक आभार मानले

Share. WhatsApp Facebook Twitter Tumblr
Team Lok Bharti Live

Related Posts

लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या अर्धकृती पुतळ्याचा उद्या जळगावात अनावरण सोहळा

July 7, 2026

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची रावेर तालुक्यातील विविध कामांना भेट,

June 21, 2026

जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांकडून नियमित योगाचा संकल्प..

June 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.