टाळ-मृदुंगाच्या गजरात श्रीसंत नामदेव महाराजांचा ६७७ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न
वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७७ वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात आज दिनांक ११ ऑगस्ट मंगळवार रोजी श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित युवक व महिला मंडळ तसेच शहरातील संयोगी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदात भरून राजाच्या आगमनात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम समाज मंदिर येथील संत नामदेव मूर्तीचे व पालखीचे पूजन माजी महापौर सीमाताई भोळे यांनी केले. यानंतर पालखी सोहळ्याला सुंदर अशा बग्गीमधून व संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याला टाळ-मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या जयघोषात सुरुवात झाली. सदर पालखी सोहळा पांझरा पोळ चौकापासून सुरुवात होऊन लेवा भवन येथे पालखी सोहळ्याचा समारोप झाला. याप्रसंगी १५०० समाज बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
सदर पालखी सोहळ्याप्रसंगी शीख बांधवांच्या वतीने श्री गुरुद्वारा साहेब येथे भव्य पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. यानंतर कार्यक्रमस्थळी संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन विद्यमान महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी सभापती चंद्रशेखर पाटील, नगरसेवक अमर जैन, नरेंद्र पाटील, सुप्रीम कंपनीचे रविकिरणजी कोंबडे, समाजाध्यक्ष श्री विवेक जगताप तसेच जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी, पिंप्राळा दादावाडी, परिसरातील संस्थांचे अध्यक्ष व संस्था संचलित शाखाध्यक्ष व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व समाजाचे व जळगाव शहरातील सर्व संस्थांचे आभार व्यक्त करताना सांगितले की, अध्यक्ष झाल्यापासून हा माझ्या कार्यकाळातील पहिला संजीवन समाधी सोहळा भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष शरदराव बिरारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून समाजातील सर्व कार्यकारणी मंडळ व कार्यकर्त्यांनी गाजरी कलर नेहरू शर्ट व सफेद कलर पैजामा परिधान केला होता तसेच महिला भगिनींनी हिरव्या कलरची पैठणी परिधान केली होती. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पालखी सोहळ्यात महिला भगिनींचे व लहान मुलींचे विशेष आकर्षण पथक, टाळ-मृदुंग व सजीव देखावा संतांची मांदियाळी सादर केली होती.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महापौर दीपमालाताई काळे, मा. महापौर सीमाताई भोळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, रविकिरण कोंबडे, दिलीप अण्णा भांडारकर, जिल्हाध्यक्ष बंडू नाना शिंपी, रवींद्र कापुरे, पी. टी. शिंपी, दिलीप अण्णा भांडारकर, रघुनाथ कोल्हटकर यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी मनोज भांडारकर, दिलीप सोनवणे, अनिल खैरनार, चेतन खैरनार, प्रदीप शिंपी, गणेश सोनवणे, शाखा अध्यक्ष निलेश जगताप, सुनील सोनवणे, सुनील गांगुर्डे, महेश शिंपी, केतन मेटकर, आनंद शिंपी, भरत सोनवणे, देविदास शिंपी, युवक अध्यक्ष हेमंत शिंपी, सचिव योगेश शिंपी, महिला अध्यक्ष माधुरी शिंपी, प्रमोद निकुंभ, कार्यकारी सदस्य राजेंद्र सोनवणे, मुकुंद मेटकर, राजेंद्र बाविस्कर, सतीश जगताप, सुरेश सोनवणे, बापू खैरनार, युवक कार्यकर्ते राहुल शिंपी, जितेंद्र शिंपी, सुमित अहिराव यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमामध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या समाज बांधवांचा सुद्धा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. यामध्ये श्री राजेंद्र सोनवणे, मयुरेश जगताप, दीपक शिंपी, रुपेश जगताप, नेरपगार यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी समाजाच्या वतीने महापौर, उपमहापौर व सभापती यांना एक निवेदन देण्यात आले की, जळगाव शहरातील एक चांगल्या चौकाला संत नामदेव-गुरुनानक देव चौक म्हणून देण्यात यावे तसेच उड्डाणपुलाला सुद्धा नाव देण्यात यावे, असा प्रस्ताव संस्थेच्या वतीने देण्यात आला. याला उपस्थित मान्यवरांनी लवकरच मंजुरी देण्याचा आश्वासन दिले.
समाजाची डिजिटल ऑनलाइन खानेसुमारी फॉर्मचे लॉन्चिंग माजी अध्यक्ष राजेंद्र कुमार सोनवणे यांच्या संकल्पनेतून सादर करण्यात आले. कार्यक्रम खेळीमेळीच्या व आनंदात संपन्न झाला.
असे गणेश सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख हितवर्धक संस्था जळगाव यांनी कळवले.
