Close Menu
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Lok Bharti Live
Button
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Home»जळगाव»नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!
जळगाव

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

Team Lok Bharti LiveBy Team Lok Bharti LiveOctober 11, 2026No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

प्रथम वर्धापनदिनानिमित्त ‘कृतज्ञता महोत्सव’ व ‘स्वर्ण शृंगार’ ऑफरचे आयोजन

 

जळगाव, दि. ११ ऑक्टोबर २०२६ ग्राहकांचा विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि दर्जेदार दागिन्यांची परंपरा जपणाऱ्या शहरातील रिंग रोड स्थित ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ यांच्या वर्धापनदिनानिमित्त ११ ते २० ऑक्टोबर २०२६ दरम्यान ‘कृतज्ञता महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून ग्राहकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वात २४ कॅरेट सोन्याच्या शिक्क्यांवर कोणतीही मजूरी नाही हा विशेष लाभ ग्राहकांना मिळणार आहे.

घटस्थापनेला ‘कृतज्ञता महोत्सवा’चे थाटात शुभारंभ

बाफना कुटुंबाची पवित्रता, पारदर्शकता आणि विश्वासाची पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा एका नवीन रूपात पुढे नेण्याची वचनबद्धता होती. या एका वर्षाच्या प्रवासात, समाजाकडून मिळालेले प्रेम, ग्राहकांकडून मिळालेला विश्वास आणि प्रत्येक प्रयत्नासाठी मिळालेली आपुलकी, ही कोणत्याही यशापेक्षा अधिक मौल्यवान आहे. हे यश ग्राहकांच्या विश्वासाचे यश आहे. आणि या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘कृतज्ञता महोत्सवा’चे आज सकाळी ११.३० वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून थाटात शुभारंभ करण्यात आले. यावेळी शहरातील मान्यवर खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे उर्फ राजुमामा,डॉक्टर उल्हास पाटील, डॉकटर . वैभव पाटील, अनिल कांकरिया, लखीचंद जैन, डॉ. आकाश जैन यांच्यासह ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’चे कस्तूरचंद बाफना, सुनील बाफना, सौ.अनिता बाफना, अभिषेक बाफना, सौ.आयुषी बाफना, ऋषभ बाफना, सौ.ऐश्वर्या बाफना, चिरंजीव . देशना व सहकारी वर्ग तसेच ग्राहक आणि मित्र परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता. दरम्यान जळगाव जिल्हाधिकारी रोहन

घुगे यांनी दालनाला भेट देत नव्या वास्तूच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व दालनातील सोने, चांदी व हिऱ्यांच्या विविध मनमोहक दागिन्यांची शृंखला निरखून ही पाहिली.

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’चा वर्षपूर्ती प्रवास

हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ने २०२१ मध्ये चांदीचे दागिने, चांदीच्या वस्तू, पूजासाहित्य, हिरे आणि राशिरत्नांच्या माध्यमातून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत ग्राहकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ने आपल्या सेवांचा विस्तार केला. गतवर्षी २२ सप्टेंबर २०२५ रोजी अर्थात नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेला नव्या भव्य दालनात सुवर्ण दागिन्यांच्या क्षेत्रात पदार्पण करत व्यवसायाचा नवा अध्याय सुरू केला.

‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’च्या या प्रवासात ग्राहकांनी दिलेले प्रेम, विश्वास आणि सहकार्य मोलाचे असल्याचे नमूद करत, त्यांच्या विश्वासाला अधिक दृढ करण्यासाठी ‘कृतज्ञता महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. पारदर्शक व्यवहार, योग्य मूल्य, माफक मजूरी आणि ग्राहकांना वैयक्तिक मार्गदर्शन ही ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ची वैशिष्ट्ये आहेत.

‘स्वर्ण शृंगार’अंतर्गत दागिन्यांच्या घडणावळीवर विशेष सवलती

ही योजना १४ डिसेंबर २०२६ पर्यंत

नवरात्रोत्सव आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच येणाऱ्या लग्नसराईनिमित्त दागिने खरेदीसाठी ‘स्वर्ण शृंगार’ योजनेत ग्राहकांसाठी दागिन्यांच्या घडणावळीवर आकर्षक सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट २५ टक्के सूट, हिरे व पोल्की दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट ३० टक्के सूट, तर चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर १५ टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच चांदीच्या वस्तूंच्या एमआरपीवर थेट १० टक्के सूट देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ‘स्वर्ण शृंगार’ या योजनेचा कालावधी ११ऑक्टोबर ते १४ डिसेंबर २०२६ पर्यंत राहणार आहे.

याशिवाय प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे पारदर्शक भाव, माफक मजुरी, शुद्धतेची खात्री, प्रमाणित दागिने आणि ग्राहकाभिमुख सेवा. उत्सवाच्या काळात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना दागिने व वस्तूंच्या खरेदीत विशेष लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.

 

योजना मर्यादित कालावधीसाठी असल्यामुळे ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ने जळगावकरांना या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. जळगाव शहरातील रिंग रोडवर स्थित जेडीसीसी बँकेसमोर असलेल्या या भव्य दालनात ग्राहकांनी भेट देऊन सुवर्ण, चांदी, पोल्की आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या आकर्षक शृंखलेला अवश्य पहावे, असे आवाहन ‘हाऊस ऑफ ज्वेल्स – बाय बाफनाज्’ तर्फे करण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Tumblr
Team Lok Bharti Live

Related Posts

‘प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सण. आदिवासी नृत्य, मल्लखांबची चित्तथरारक प्रात्यक्षिके अन् वृषभराजाची भव्य मिरवणूक ठरली आकर्षण

September 10, 2026

पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.