जळगावात अशोक लेलँडच्या ‘अयांश ऑटोमोबाईल्स’ या नव्या शोरूमचे भव्य उद्धघाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ची विशेष उपस्थिती लाभणार ! जळगाव, दि. २९ ऑक्टोबर :* शहरात हिंदूजा समूहाच्या अशोक लेलँडचे जळगावचे अधिकृत सेल्स व सर्व्हिस पॉईंट म्हणून ‘अयांश ऑटोमोबाईल्स’ या अत्याधुनिक लाईट कमर्शियल व्हेइकल्स शोरूमचे भव्य उद्घाटन उद्या गुरुवारी, ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. अशोक लेलँड लिमिटेडचे LCV प्रमुख श्री. विप्लव शाह यांच्या शुभहस्ते हा शानदार सोहळा संपन्न होणार असून, कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणून महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची सुद्धा विशेष उपस्थिती लाभणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला शहरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.एमआयडीसी परिसरातील मारुती…
Author: Team Lok Bharti Live
नोडा मुंबई संस्थेद्वारा 100 प्रज्ञाचुक्ष व दिव्यांग बांधवांना दिवाळी फराळ भेट वस्तू वाटप जागतिक पांढरी काठी दिनानिमित्ताने तसेच दिवाळीनिमित्त आज दिनांक 26 ऑक्टोबर रविवार रोजी दुपारी 2 वा इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव येथे मुंबई नोडा संस्थेद्वारा जिल्ह्यातील शंभर प्रज्ञाचूक्ष व दिव्यांग बांधवांना आज दिवाळीचा फराळ व भेट वस्तु वाटप करण्यात आला कार्यक्रमा साठी जलसंपदा मंत्री मा ना गिरीश भाऊ महाजन जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा जैन उद्योगाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ केतकी ताई पाटील श्री साई संस्थान अध्यक्ष सुनील भाऊ झवर उद्योजक सागर चौबे यांच्या अनमोल सहकार्याने दिवाळीचा फराळ, स्टीलचा डबा, ड्रायफ्रूट, मिठाई, वाटप…
औट्रम घाटात ५.५० किमी लांबीच्या बोगद्याला केंद्र सरकारची मंजुरी – खासदार स्मिता वाघ ₹२,४३५ कोटींच्या प्रकल्पाला हिरवा कंदील; मराठवाडा आणि खान्देशातील वाहतूक होणार अधिक सुरक्षित आणि सुलभ जळगाव, दि. २६ ऑक्टोबर :धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील औट्रम घाट हा राज्यातील सर्वात अवघड आणि धोकादायक घाट म्हणून ओळखला जातो. अनेक वर्षांपासून या घाटावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अपघात, वाहतूक कोंडी आणि विलंबाचा सामना करावा लागत होता. आता या घाटावरून प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने ५.५० किलोमीटर लांबीच्या अत्याधुनिक बोगद्याच्या बांधकामास मंजुरी दिली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर सुमारे ₹२,४३५ कोटी खर्च होणार असून, टेलवाडी ते बोधरे या सुमारे १५ किलोमीटरच्या टप्प्यात…
महाराणा प्रताप विद्यालयात २३ वर्षा नंतर एकत्रआले वर्गमित्र जळगांव शहरातील प्रेम नगर येथिल महाराणा प्रताप विद्यालयतील २००२ मध्ये दहावी उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थीचा स्नेहमेळावा शनिवारी प्रेम नगरातील महाराणा प्रताप विद्यालयात पार पडला २३ वर्षानी एकत्र जमलेल्या वर्ग मित्रांनी जुन्या आठवणीनां उजाळा दिला दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात सारे रमुन गेले होते. माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात विद्यालयाच्या सुमारे ७० माजी विद्यार्थीनी खावेळी हजेरी लावली होती २३ वर्षा नंतर भेट झाल्यावर काहीना चेहरे ओळखीचे तर काहीनां अनओळखी भासले नंतर परिचय देऊन शाळेतील आठवणी परस्परांच्या वाटचालीबद्दल गप्पा गोष्टी, खेळ आदी कार्यक्रमांना दिवसभर रमुन गेले होते. सर्वांनी स्नेह भोजनाचा आनंद घेतला विद्यालयातील मुख्यध्यापिका शर्मा मॅडम…
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा आयुष भामरे देशातून द्वितीयके.सी.ई. संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांच्याकडून ₹५०००/- चा विशेष पुरस्कार जाहीर जळगाव -के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता १२वी (विज्ञान शाखा) विद्यार्थी आयुष महेंद्र भामरे याने नुकत्याच झालेल्या भारतीय ज्ञान परंपरा (संस्कृत) ऑलिम्पियाड २०२५ मध्ये राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून अभूतपूर्व यश संपादन केले आहे.या यशाच्या पार्श्वभूमीवर के.सी.ई. संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांनी आयुष भामरेला ₹५०००/- चा विशेष पुरस्कार जाहीर करून त्याचा गौरव केला.प्रज्ञावंत बेंडाळे सर म्हणाले,“आयुष भामरेने राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश आमच्या संस्थेसाठी अभिमानाचा क्षण आहे. संस्कृत आणि भारतीय ज्ञान परंपरेसारख्या समृद्ध विषयात आजच्या तरुण पिढीकडून…
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा कुमार उज्वल गवळीची राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड जळगांव- क्रीडा युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक ,जिल्हा परिषद नाशिक, यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय विभाग स्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले होते यात खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या 19 वर्षाखालील उज्वल ललित गवळी यांनी सहभाग घेऊन त्यामध्ये कास्यपदक प्राप्त केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालीराज्यस्तरीय स्पर्धा 26 ऑक्टोबर ते 28 सप्टेंबर 2050 नागपूर येथे होणार आहेत.उज्वल ललित गवळी या खेळाडूंला क्रीडाशिक्षक डॉ. रणजीत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कुमार उज्वल गवळी यांचे संस्थाध्यक्ष प्रज्ञावंत आदरणीय…
जळगाव- केसीई सोसायटी संचलित ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात 2004 या शैक्षणिक वर्षाच्या बॅचच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला भेट दिली.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. विद्यार्थ्यांनी शाळेत आल्यानंतर वीस एकवीस वर्षांपूर्वी शाळेत आपण कसे होतो, किती मस्ती करायचो, शिक्षकांच्या हातचा किती मार खायचो, या सर्व आठवणी जाग्या केल्या. सर्वात महत्त्वाचे आलेले सर्व विद्यार्थी शाळेचे वर्गातले बॅकबेंचर्स होते पण आज त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने यशस्वी होते.पुण्याच्या येरवडा जेलमध्ये पी.एस.आय जेलर बनलेल्या परविन तडवी या विद्यार्थिनीने शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. रूपाली ओगले मुंबईला शिक्षिका असणारी रूपाली शिंदे,साडेचारशे मुलांना डबा पुरवणारी मेस चालवणारी कविता पाटील या विद्यार्थिनींना शाळेत आल्याबद्दल…
श्री स्वामी समर्थ प्रताप नगर केंद्रामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी ६:०० वाजेच्या आरतीला गोवर्धन अन्नकूट हा उत्सव साजरा करण्यातआला होता उत्सवामध्ये लागणारे निवडलेल्या पदार्थाचे प्रमाण किमान अर्धा किलो एवढे होते पदार्थ जमा करून अन्नकूट संपन्न
पाडवा पहाट कार्यक्रमास रसिकांची उत्स्फूर्त दाद स्वर्. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित २४ व्या “पाडवा पहाट” या प्रातःकालीन मैफलीचे आयोजन महात्मा गांधी उद्यानात पहाटे ६ वाजता करण्यात आले होते. यामध्ये प्रख्यात राष्ट्रीय कीर्तनकार, शास्त्रीय तसेच नाट्यसंगीत गायक व नट डॉ. चारुदत्त आफळे यांच्या नाट्यसंगीत व अभंग वाणी या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार गुरुवंदना जळगावचे गायक वरुण नेवे यांनी सादर केली. त्यानंतर दीप प्रज्वलन डॉ. रणजीत चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर व सचिव अरविंद देशपांडे तसेच आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती डॉ. चारुदत्त आफळे यांनी केले. कलाकारांचा सत्कार मेजर नानासाहेब वाणी, विवेकानंद कुलकर्णी…