श्री स्वामी समर्थ प्रताप नगर केंद्रामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी ६:०० वाजेच्या आरतीला गोवर्धन अन्नकूट हा उत्सव साजरा करण्यातआला होता उत्सवामध्ये लागणारे निवडलेल्या पदार्थाचे प्रमाण किमान अर्धा किलो एवढे होते पदार्थ जमा करून अन्नकूट संपन्न
Author: Team Lok Bharti Live
पाडवा पहाट कार्यक्रमास रसिकांची उत्स्फूर्त दाद स्वर्. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित २४ व्या “पाडवा पहाट” या प्रातःकालीन मैफलीचे आयोजन महात्मा गांधी उद्यानात पहाटे ६ वाजता करण्यात आले होते. यामध्ये प्रख्यात राष्ट्रीय कीर्तनकार, शास्त्रीय तसेच नाट्यसंगीत गायक व नट डॉ. चारुदत्त आफळे यांच्या नाट्यसंगीत व अभंग वाणी या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार गुरुवंदना जळगावचे गायक वरुण नेवे यांनी सादर केली. त्यानंतर दीप प्रज्वलन डॉ. रणजीत चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर व सचिव अरविंद देशपांडे तसेच आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती डॉ. चारुदत्त आफळे यांनी केले. कलाकारांचा सत्कार मेजर नानासाहेब वाणी, विवेकानंद कुलकर्णी…
सर्वसामान्य जनतेची कामे करणारे आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मनोगत जळगाव दि. १७ :(जिमाका वृत्त सेवा) आपल्या कामात सदैव तत्पर राहुन सर्वसामान्यांची कामे करणारे आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद आहेत. अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मावळचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या कामाचे कौतुक करून त्यांचा गौरव केला.तत्कालीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा निरोप समारंभ व नवीन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा स्वागत समारंभ प्रसंगी पालकमंत्री श्री पाटील बोलत होते.यावेळी व्यासपीठावर आमदार, सुरेश(राजू मामा )भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण तत्कालीन जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी, महानगरपालिका…
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित “पाडवा पहाट” या कार्यक्रमाचे सालाबाद प्रमाणे आयोजन करण्यात आलेले आहे. बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पहाट गेली २३ वर्षे प्रतिष्ठान साजरी करीत आलेले आहे. यंदाचे हे २४ वे वर्ष आहे. ही प्रात:कालिन मैफल ठीक ६ वाजता महात्मा गांधी उद्यानात आयोजित करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी राष्ट्रीय कीर्तनकार, अनेक संगीत नाटकांमध्ये गायकांची भूमिका सादर करणारे प्रख्यात गायक पंडित चारुदत्त आफळे हे यंदाचे कलाकार असून त्यांना तबल्याची संगत रामकृष्ण करंबेळकर ऑर्गन ची संगत राहुल गोळे तर व्हायोलिनची संगत प्रमोद जांभेकर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी कै. नथ्थू शेट चांदसरकर ट्रस्ट तसेच भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशन चे सहकार्य…
दिव्यांगांच्या हजारो दिव्यांनी उजळले चिमुकले श्रीराम मंदिरदिव्यांगांनी सजविल्या पणत्या, मान्यवरांनी केले कौतुक जळगाव, दि.२० – जळगाव जिल्ह्यातील रुशिल मल्टिपर्पज फाऊंडेशन संचलित उडान दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांनी यंदा देखील आपली आगळीवेगळी दिवाळी साजरी केली. चिमुकले श्रीराम मंदिरात ११५१ दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. रुशिल मल्टिपर्पज फाऊंडेशन संचलित उडान दिव्यांग पुनर्वसन केंद्रातर्फे दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जातो. दिव्यांग विद्यार्थी आणि पालकांनी सजवलेल्या विविधरंगी पणत्या प्रज्वलित करून हा उपक्रम चिमुकले श्रीराम मंदिरात पार पडत असतो. यंदा देखील चिमुकले श्रीराम मंदिरात ११५१ पणत्या प्रज्वलित करून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, ह.भ.प. दादा महाराज जोशी, जैन…
श्री स्वामिनारायण मंदिर जळगाव येथे अडीच वर्षांपासून बाल संस्कार केंद्राचे यशस्वी आयोजन जळगाव –धार्मिक संस्कार, नीतिमूल्ये आणि भारतीय परंपरेचे बीज लहान मुलांच्या मनामध्ये रोवण्यासाठी श्री स्वामिनारायण मंदिर, जळगाव येथे गेली अडीच वर्षांपासून बाल संस्कार केंद्र यशस्वीरित्या चालवले जात आहे. या केंद्राचा उद्देश म्हणजे बालकांमध्ये सद्गुणांची जडणघडण करून त्यांना उत्तम नागरिक आणि संस्कारित व्यक्तिमत्त्व म्हणून घडवणे. केंद्रात 8 ते 25 वयोगटातील मुला–मुलींचा उत्स्फूर्त सहभाग आहे. प्रत्येक रविवारी सकाळी घेण्यात येणाऱ्या या वर्गांमध्ये श्लोक पठण, भजन, स्तोत्र, नैतिक गोष्टी, नाटिका, प्रश्नोत्तरे, योग व प्रार्थना अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. मुलांना श्रद्धा, प्रामाणिकपणा, सेवा, अनुशासन आणि देशप्रेम यांचे महत्त्व…
भुसावळ येथे ‘राष्ट्र सेविका समिती’ मार्फत आयोजित ‘शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सव’ मध्ये केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थिती. भुसावळ– ‘हम करे राष्ट्र आराधन’या विचारधारेवर कार्यरत असलेल्या “राष्ट्र सेविका समिती” या अखिल भारतीय महिला संघटनेला यावर्षी ८९ वर्षे पूर्ण होत असून, देशभरातील तसेच परदेशातील शाखांमधून विविध उपक्रमांच्या माध्यमातून संघटनेचे कार्य सातत्याने चालू आहे. या पार्श्वभूमीवर *रावेर लोकसभा क्षेत्र अंतर्गत “राष्ट्र सेविका समिती”भुसावळ शाखेतर्फे “शस्त्रपूजन आणि विजयादशमी उत्सव” चे अहिल्यादेवी कन्या विद्यालय, जामनेर रोड, भुसावळ येथे आयोजन करण्यात आले असता कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी प्रमुख अतिथी म्हणून तर विभाग बौद्धिक प्रमुख श्रीमती अनिताताई अनिल कुलकर्णी यांनी…
मंत्री, गिरीश महाजन यांचे वर्षभराचे वेतन रूपये ३१ लक्ष मुख्यमंत्री सहायता निधीस ! वर्षभराचा पगार देणारे राज्यातील पहिलेच मंत्री मुंबई (दि.07/10/2025) राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मंत्री पदाचा वर्षभराभरातील वेतन रक्कम रुपये ३१ लक्ष १८ हजार २८६ मा. मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहेत. त्याबाबतचे धनादेश व संमतीपत्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज रोजी मंत्रीमंडळाच्या बैठकी प्रसंगी सादर केले. राज्यात मुसळधार पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान तसेच राज्यातील विविध भागात महापुरामुळे झालेले नुकसान यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून नागरिकांना मदत करण्यात येत आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री गिरीश महाजन यांनी राज्यातील…
गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे शिरसोली येथे दंत तपासणी शिबीर जळगाव, दि. ४ (प्रतिनिधी) – गांधी रिसर्च फाउंडेशन , रोटरी क्लब ऑफ राँयल, इंडियन डेंटल असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिरसोलीत दंत तसासणी शिबीर घेण्यात आले. शिबिरात एकूण 200 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. रोटरी क्लब राँयलचे अध्यक्ष जितेंद्र भोजवानी, जितूलाल रोटे, डॉ. जयदीपसींग छाबडा, डॉ. बिंदू छाबडा, डॉ. वर्षा रंगलानी, डॉ. स्नेहल महाजन यांनी सेवा दिली. बारी समाज प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यासाठी मोफत मौखिक दंत तपासणी शिबीर आयोजित केले होते. यावेळी विद्यार्थ्यांना वैक्तिगत स्वच्छतेबाबत प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. आरोग्यावर आधारीत नाटीका सादर करण्यात आली. डॉ. ज्योत्सना पाटील यांनी ‘व्यसनांचे दुष्परिणाम’…
शासकीय नोकर म्हणून नव्हे तर जनतेचे सेवक म्हणून काम करा पालकमंत्री गुलाबराव पाटील नियुक्ती पत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न जळगाव, दिनांक ४ ऑक्टोंबर (जिमाका वृत्तसेवा): शासकीय नोकरीत रुजू होताना आपल्या मनात केवळ ‘नोकरी’ ही भावना न ठेवता ‘जनतेची सेवा’ हीच भावना ठेवा. शासकीय नोकर म्हणून नव्हे तर जनतेचे सेवक म्हणून काम करा,” असे भावनिक प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित अनुकंपा भरती 2025 अंतर्गत गट क व गट ड संवर्गातील उमेदवार, महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत लिपिक टंकलेखक भरती 2023 गट क या संवर्गातील उमेदवारांच्या नियुक्ती आदेशांचे वाटप…