के सी ई इंजिनीरिंग (स्वायत्त ) महाविद्यालयांत माहितीचा अधिकार दिन जळगाव-खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत माहितीचा अधिकार दिवस करण्यात आला . कार्यक्रमाचे वेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांनी केंद्र व राज्य शासनाने माहिती अधिकार केव्हा सुरु केले या बद्दल माहिती दिली माहिती अधिकार दिन हा दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो, जो जागतिक स्तरावर माहितीच्या सार्वत्रिक प्रवेशासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवसाच्या निमित्ताने, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने माहितीच्या प्रवेशाचे महत्त्व ओळखून, लोकांना सरकारी कामांची माहिती मिळवण्याचा हक्क आहे यावर जोर दिला जातो. भारतात हा कायदा, २००५ मध्ये लागू झाला, ज्यामुळे…
Author: Team Lok Bharti Live
जळगाव – महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव, जिल्हा जळगाव यांच्या वतीने 10 वा ऋणानुबंध वधु-वर-पालक परिचय मेळावा, १८ जानेवारी २०२६ रोजी आयोजन आदित्य लॉन.एम.आय.डि.सी लोकमत कार्या लाय जवळ जळगाव येथे होणार. त्या बाबतची जळगाव येथील सोनार समाज बांधवांची मीटिंग येथे पार पडली. मीटिंग च्या अध्यक्ष स्थानी मा. श्री. राजेंद्र रामदासशेठ बिरारी हे होते.प्रसंगी उपस्थित समाज बांधवांनी अनेक सूचना मांडल्या. सर्व सूचनांवर विचार करून पुढील नियोजन करू अशी ग्वाही महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव, जिल्हा जळगाव चे अध्यक्ष श्री. संजय विसपुते यांनी दिली.मेळावा नियोजन अतिशय सूत्रबद्ध पद्धतीनं व्हावा यासाठी मेळावा नियोजन समिती जाहीर करण्यात आली. ऋणानुबंध २०२६ वधु-वर-पालक परिचय मेळावा कार्यकारिणी -…
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या मार्गदर्शनात जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित क्रिकेट पंचाची कार्यशाळा संपन्न जळगाव दि. 15 प्रतिनिधी- जळगाव येथील जैन हिल्स वरील सुबीर बोस हॉल मध्ये उत्तर व मध्य महाराष्ट्रातील क्रिकेट पंचाच्या कार्यशाळेचे आयोजन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे दि. १३ व १४ सप्टेंबर २०२५ दरम्यान करण्यात आले होते. या कार्यशाळेत ४५ जळगाव सह नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, तसेच छत्रपती संभाजी नगर येथील पंच सहभागी होते. कार्यशाळेला प्रशिक्षक म्हणून सर्वश्री अजय देशपांडे, (छत्रपती संभाजी नगर) संदीप चव्हाण (नाशिक), मंगेश नार्वेकर (रत्नागिरी) व संदीप गांगुर्डे (जळगाव) यांचा समावेश होता. या दोन दिवसीय कार्यशाळेत क्रिकेट खेळतील बदलेले नियम याबाबत…
“संस्था आपलीच मानून काम केले तर प्रगती निश्चित” – खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांचे प्रतिपादन; चेअरमन रोहित निकम यांच्या कामाचे कौतुक जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न जळगाव, दि. १३ सप्टेंबर २०१५ – जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन रोहित निकम आणि राज्यसभा खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडली. सभेत राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य पदी निवड झाल्याबद्दल पद्मश्री खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांचे सर्वानुमते अभिनंदनाचा ठराव मंजूर करून सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना ॲड. निकम म्हणाले, “संस्था कोणतीही असो ती आपली मानून काम…
जळगाव – खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीची स्थापना १९४४ मध्ये झाली.सुरवातीला विद्या प्रसारक संस्थेच्या वास्तुत १९४४ ते १९४९ पर्यंत होती. त्यानंतर दानशूर मूळजी जेठा यांनी दिलेल्या जागेत संस्था उभी राहिली. सर्वांना शिक्षण देण्याच्या उद्देशानं “ज्ञान प्रसारो व्रतम” या ब्रीद वाक्याने शिक्षण प्रसारण करण्यास वचनबद्ध असलेली एक संस्था म्हणून जळगाव (महाराष्ट्र) येथे या संस्थेची स्थापना झाली.मागील पाच वर्षात आयएमआर,इंजिनीअरिंग,मुलांचे वसतिगृह ,लाँ कॉलेज,आणि सुसज्ज ५०० प्रेक्षक क्षमता असलेले नाट्यगृह अशी विशेष कामगिरी झाली आहे.राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२०नुसार, केसीई सोसायटी आता अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विज्ञान, कला, वाणिज्य, भारतीय ज्ञान प्रणाली (IKS), भारतीय संगीत, रिफ्लेक्सोलॉजी, निसर्गोपचार आणि योग विज्ञान यांसारख्या विविध शाखांमध्ये पदवी, पदव्युत्तर आणि…
मलकापूर येथे आयोजित “मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान २०२५” अंतर्गत “तालुकास्तरीय कार्यशाळा” कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित. रावेर लोकसभाअंतर्गत मलकापूर येथे मलकापूर विधानसभा क्षेत्रमध्ये ग्रामविकास, ग्रामपंचायत व पंचायतराज सशक्तीकरण अंतर्गत पंचायत समिती, मलकापूर व पंचायत समिती, नांदुरायांच्या संयुक्त विद्यमाने “मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान २०२५”अंतर्गत “तालुकास्तरीय कार्यशाळा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री ना.श्री. संजयजी सावकारे व कामगार मंत्री ना.श्री.आकाशजी फुंडकरतर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मलकापूर विधानसभा आमदार श्री. चैनसुखजी संचेतीहे प्रमुख उपस्थितीत होते. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागमार्फत दि. १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये…
जळगावच्या मुलांना राज्य आट्यापाट्या स्पर्धेत विजेतेपद मुलीं तृतीय स्थानी जळगाव : – महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाच्या वतीने खामगाव, जिल्हा बुलढाणा येथे नुकत्याच पार पडलेल्या ३२ व्या सब-ज्युनियर गट राज्य अजिंक्यपद आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेत जळगाव जिल्हा मुलांनी दिमाखदार कामगिरी करत विजेतेपद प्राप्त केले .अंतिम फेरीत त्यांनी यजमान बुलढाणा संघावर २-० सेट्सने मात करत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत जळगाव संघाचा तन्मय डोळे याने संपुर्ण स्पर्धेत उत्कृष्ट आक्रमण व संरक्षणाची कामगिरी केल्याने त्यास स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. संघाचा कर्णधार निखिल पाटील, ओम गायकवाड अनमोल तेलंग यांनी प्रभावी खेळ करत प्रेक्षकांची मने जिंकली. या विजयासह जळगावने पाचव्यांदा राज्य विजेतेपद मिळविले आहे.ज…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर भाजपा जिल्हा महानगर तर्फे सेवा पंधरवडा राबवणार आ.सुरेश भोळे (राजू मामा) भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराची महत्त्वपूर्ण बैठक आज दिनांक १२ सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता नवीन भाजपा कार्यालय, जीएम फाउंडेशन येथे जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा), जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीमध्ये दि. 17 सप्टेंबर रोजी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवाडा कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले आहे. या सेवा पंधरवड्यात घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या समितीसुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात…
भिडे गुरूजींसह केंद्रीय मंत्र्यांकडून पाटील परिवाराचे सांत्वन जळगाव -स्व. गोदावरी आई पाटील यांच्या दु:खद निधनानंतर राज्यभरातून पाटील कुटुंबाचे सांत्वन केले जात आहे. शुक्रवारी १२ रोजी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांनी माजी खा. डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, सुभाषदादा पाटील यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनीही स्व. गोदावरी आई यांना अभिवादन करीत पाटील परिवाराचे सांत्वन केले. याप्रसंगी डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील यांच्यासह परिवारातील सदस्य उपस्थित होते.
मू. जे. महाविद्यालात युवती सभेचे उद्घाटन जळगाव- केसी ई सोसायटी संचलित मू. जे. महाविद्यालयात युवती सभेचे उद्घाटन दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमा अंतर्गत, विद्यार्थिनींचे आरोग्य व समस्या लक्षात घेऊन योग व ध्यान प्रशिक्षण देण्यात आले.युवती सभेचे उद्घाटन के. सी. ई. संस्थेच्या शैक्षणिक संचालिका डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून वाणिज्य शाखेच्या उप-प्राचार्य डॉ. सुरेखा पालवे, युवती सभेच्या अध्यक्षा डॉ. स्वप्नाली वाघुळदे, योग मार्गदर्शक म्हणून डॉ. देवानंद सोनार व डॉ. ज्योती वाघ आदी उपस्थित होते.साधारण वार्षिक पातळीवर युवती सभेंतअंतर्गत आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा युवती समिती अध्यक्षा यांनी दिला. डॉ. फडणवीस यांनी युवतींना शिक्षण व…