भाजप जिल्हा महानगर गणराया पुरस्कार 2025 68 मंडळांना सन्मानित ना गिरीश भाऊ महाजन व आ सुरेश भोळे यांनी दिला कार्यकर्त्यांच्या समवेत ढोल ताशांवर ठेका भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या 68 गणेश मंडळांना गणराया पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले अतिशय भव्य असं व्यासपीठ टावर चौक येथे भारतीय जनता पार्टीचे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते या ठिकाणी एलईडी स्क्रीन द्वारे रोषणाई करण्यात आली होती तसेज राष्ट्र पुरुषांचे प्रतिमा व त्यांचे संदेश या एलईडी स्क्रीन द्वारे दिसत होते मिरवणुकीची सुरुवात दुपारी 12 वाजता सुरू होऊन रात्री 12:30 वाजेपर्यंत सुरू होती गणराया…
Author: Team Lok Bharti Live
शिक्षक दिनानिमित्त शेठ ला. ना. सा.विद्यालयात 110 विद्यार्थांनी सांभाळले सर्व शालेय कामकाज जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना.सा.विद्यालयात 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त सर्व शालेय कामकाज इयत्ता 5 वी ते 10 वी मधील निवडक 110 विद्यार्थ्यांनी सांभाळून आपल्यातील वक्तृत्व, नेतृत्व,कर्तृत्व,संभाषण,सहकार्य ,अध्ययन,अध्यापन,सेवा,प्रशासन कौशल्य आदी गुणांचा परिचय करून दिला.या वेळेस इयत्ता 10 वी मधील केशव मराठे याने छात्र मुख्याध्यापक,यजुर्वेद काळे याने छात्र उप मुख्याध्यापक,मुस्तफा पिंजारी ,लीना घुगे यांनी छात्र पर्यवेक्षक म्हणून तसेच इतर विद्यार्थांनी वर्गशिक्षक,क्रीडा शिक्षक,विविध विषय शिक्षक ,शिपाई ,व शिक्षकांची वेशभूषा करून उत्तम भूमिका बजावली.या वेळेस विद्यार्थांनी सुरवातीस शालेय प्रार्थना, राष्ट्रगीत,महाराष्ट्र राज्य गीत प्रतिज्ञा,ईश्वर प्रार्थना घेऊन शालेय कामकाजास सुरुवात…
बायोकॅमिस्ट्री विभागात ‘ताण व्यवस्थापन’ वर प्रेरणादायी मार्गदर्शन जळगाव – केसीई सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव येथील बायोकॅमिस्ट्री विभागाच्या वतीने पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी “ताण तणाव व्यवस्थापन” या विषयावर एक विशेष अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात चेतना व्यसनमुक्ती केंद्र, जळगाव चे संचालक डॉ. नितीन विसपुते हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. मृणालिनी फडणवीस, शैक्षणिक संचालक, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी, जळगाव या होत्या. कार्यक्रमाचे संचालन व सूत्रसंचालन डॉ. उमेश वाघ यांनी केले. डॉ. विसपुते यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाढणाऱ्या मानसिक ताणाचे कारण, परिणाम आणि प्रतिबंध यावर सखोल व अनुभवसिद्ध मार्गदर्शन केले. त्यांनी श्वसन तंत्र, ध्यानधारणा, वेळेचे नियोजन, शारीरिक व्यायाम, तसेच सकारात्मक…
जळगाव जिल्ह्याची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी व योगदान समजून घेणे महत्वाचे – रेडक्रॉस आयोजित अमृतसर येथील आपतग्रस्तांना मदत देणाऱ्या संस्थां व मान्यवर सन्मान प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांचे मनोगत. जळगाव – “एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ”या उदात्त हेतूने अमृतसर पंजाब येथील आपतग्रस्तांचे विस्कळीत जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी रेडक्रॉसने केलेल्या आवाहनाला त्वरित प्रतिसाद देणाऱ्या संस्थांचा व मान्यवरांचा सन्मान सोहळा रेडक्रॉस येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना चेअरमन डॉ. मंगला ठोंबरे यांनी रेडक्रॉसमार्फत केलेल्या आवाहनाला आपण दिलेला प्रतिसाद हा कौतुकास्पद असून आपल्या सर्वांच्या दातृत्वाबद्दल रेडक्रॉस आपले मनस्वी करत आभार व्यक्त करते अशा शब्दांत कौतुक केले.…
पाळधी-खोटेनगर व कालिंका माता–तरसोद मार्ग काँक्रिटीकरणचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न! २७.५० कोटींच्या निधीतून १५ मी.चे रुंदीकरण: प्रवाशांना मोठा दिलासा. जळगाव दि. ८ सप्टेंबर (जि मा का वृत्त सेवा) जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा रस्ता आर्थिक व सामाजिक विकासाचा महामार्ग ठरणार आहे. अनेक अपघात, धूळधाण आणि रहदारीच्या त्रासातून प्रवाशांना दिलासा मिळणार असून जून २०२६ पर्यंत जरी मुदत असली तरी मार्चमध्येच हा रस्ता जनतेच्या सेवेत आणण्याचा आमचा निर्धार आहे. रस्त्याच्या कामावरील ठिकठिकाणी फलक लावून वाहतुकीला अडथळा होणार नाही याची ठेकेदारांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती…
गणेश विसर्जनानंतर विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम जळगाव : शहराच्या स्वच्छतेसाठी उपयुक्त असा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही विवेकानंद प्रतिष्ठान, जळगाव राबवित आहे. गणेश विसर्जनानंतर ७ सप्टेंबर २०२५ रविवार रोजी सकाळी “स्वच्छ भारत – सुंदर भारत”या संकल्पनेतून शिवतीर्थ मैदान ते सुभाष चौक या मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत विवेकानंद प्रतिष्ठान जळगाव संस्थेच्या शाळा व महाविद्यालय यामधील सुमारे १५०० विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले असून, मार्गावरील कचरा त्याची योग्य विल्हेवाट लावली. विशेष म्हणजे, पर्यावरण संरक्षणाचा विचार करून व्यवस्थापन करण्यात आले. या स्वच्छता उपक्रमात काशीनाथ पलोड पब्लिक स्कूल (C.B.S.E.), ब. गो. शानभाग विद्यालय, इंग्लिश मिडियम स्कूल, प्राथमिक व…
“5G-6G काही आले तरी गुरुG शिवाय भविष्य नाही” – पालकमंत्री गुलाबराव पाटीलजि ल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी पटसंख्या वाढवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे शिक्षकांना आवाहन*. ला.ना. हायस्कूलमध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा थाटामाटात संपन्नज ळगाव प्रतिनीधी दि. 5 सप्टेंबर – प्रत्येकाच्या जीवनात गुरुजींचा आशीर्वाद अत्यंत महत्त्वाचा आहे. 5G-6G काही आले तरी गुरुG शिवाय भविष्य उजळणार नाही. शिक्षकांनी बदलत्या काळात अपडेट राहणे गरजेचे आहे. मराठी शाळांचे वैभव टिकवण्यासाठी पटसंख्या वाढवणे हीच शिक्षकांची खरी जबाबदारी आहे. जि.प. शाळा म्हणजे गरीब व सामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांचा आसरा असून त्यांचे भवितव्य गुरुजींच्या हातात आहे. गुरुजी हा संपूर्ण समाजाचा आदर्श आहे. विद्यार्थ्यांचे यश हेच शिक्षकांचे खरे पारितोषिक…
श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धेत हर्षाली पाटील, चंचल गांगुर्डे, मिताली काळे प्रथम वाकोद, ता.जामनेर, दि.९* : वाकोद येथील राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयात श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या ८९ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत मुलींचे वर्चस्व राहिले. स्पर्धेतील तिन्ही गटात मुलींनी पहिला क्रमांक मिळवला. हर्षाली पाटील, चंचल गांगुर्डे आणि मिताली काळे यांनी वत्कृत्व स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पाच हजार रुपयांचे पारिषोतिक, स्मृतीचिन्ह मिळवले. वत्कृत्व स्पर्धेसाठी पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि अकरावी ते बारावी असे तीन गट तयार करण्यात आले होते. स्पर्धेच्या उद्घाटनानंतर…
जैन इरिगेशनला निर्यातीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार कंपनीचे उपाध्यक्ष अनिल जैन, अथांग जैन यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडून स्वीकारला पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सोहळ्यास उपस्थिती नवीन तंत्रज्ञान कृषीक्षेत्रात विकसीत करून संशोधनाच्या क्षेत्रात दैदीप्यमान काम केलेल्या व शेतक-यांच्या जीवनात मोठे आर्थिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या जैन इरिगेशनचा शिरोपेचात आणखी एक पुरस्कार वाढला आहे. जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडला निर्यातीत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ५६व्या ईईपीसी इंडिया नॅशनल एक्सपोर्ट अवॉर्ड्स गौरविले गेले आहे. इंडस्ट्रीयल मशनरी अँड इक्यूपमेंट लार्ज एन्टरप्राईजेस गटात उत्कृष्ट निर्यातबद्दलचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे हा पुरस्कार देण्यात आला. या सोहळ्याला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुख्य…
सुमारे तीन हजार गणेश भक्तांनी केले धारा प्रवाही गणपती अथर्वशिर्षाचे पठण गणपती अर्थवशीर्ष ही गणपतीची सर्वोच्च स्तुती, अथर्व मुनीनीं रचलेली संस्कृत रचना आहे. गणपतकच्या या उच्च कोटीच्या सेवेत तीन हजार गणेश भक्तांनी धाराप्रवाही गणपती अथर्वशिर्षाचे पठणातून केली. रविवार, दि. ३१/०८/२०२५ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत सुभाष चौकाच्या मानाचा गणपती सन्मुख शास्त्रशुध्द व भक्तीमय वातावरणात हा उपक्रम संपन्न झाला. तीन हजार अथर्वशिर्ष मुखोदग असलेल्या गणेश भक्तंनी एका स्वरात धारा प्रवाहीत लागोपाठ २१ आवर्तने म्हणुन पन्नास हजार पेक्षा अधिक सामुहिक आवर्तने झाली. याप्रसंगी सुभाष चौक खचाखच भरले होते. सुभाष चौक मित्र मंडळ, सुभाष चौक नागरी पतसंस्था जळगांव व श्री स्वामी…