Close Menu
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Lok Bharti Live
Button
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Home»जळगाव»आर. आर. विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरा
जळगाव

आर. आर. विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरा

Team Lok Bharti LiveBy Team Lok Bharti LiveAugust 25, 2026No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

 

जळगाव : ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित आर. आर. विद्यालय, जळगाव येथे दिनांक २७ ऑगस्ट 2026, गुरुवार रोजी रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांच्या मनगटावर राख्या बांधून भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व सांगणारी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, स्नेह, आपुलकी, बंधुभाव व सामाजिक बांधिलकीची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमास विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री. डी. बी. पांढरे सर, गाईड शिक्षिका श्रीमती आर. जे. लांबोळे मॅडम,व सौ. एस. ए. साळी मॅडम,स्काऊट शिक्षक श्री. के. आर. वंजारी सर आदी शिक्षक उपस्थित होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत या सणामागील सामाजिक व भावनिक मूल्यांची माहिती दिली.

विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने विद्यालयात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले 

Share. WhatsApp Facebook Twitter Tumblr
Team Lok Bharti Live

Related Posts

भुसावळच्या राजकारणाला नवे वळण प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी, भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. गायत्रीताई भंगाळे यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

September 3, 2026

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार

September 3, 2026

बुलढाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या भव्य व दिमाखदार वास्तूत स्थलानंतर

August 26, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.