Close Menu
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Lok Bharti Live
Button
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Home»जळगाव»बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा
जळगाव

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

Team Lok Bharti LiveBy Team Lok Bharti LiveAugust 25, 2026No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

२६ ऑगस्टला भव्य कार्यक्रम; सहकार क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

 

जळगाव | प्रतिनिधी : सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या जागेतील स्थलांतर सोहळा बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. जळगाव शहरातील प्रतापनगर,जवळ ढाके कॉलनी गणेश कॉलनी रोडवरील राजश्री शाहू कॉम्प्लेक्ससमोरील ‘बुलडाणा अर्बन भवन’ येथे या स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर होणार आहे.

या सोहळ्यास बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक (भाईजी),बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. सुकेशजी झंवर , बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा सौ. कोमलताई झंवर व पाचोरा एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष सुभाषजी तोतला, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.उद्घाटनानंतर कानळदा रोडवरील के.सी. पार्कसमोरील समर्थ लॉन्स येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यात ३२ शाखांचे जाळे

बुलडाणा अर्बनने जळगाव जिल्ह्यात आपल्या सेवांचा विस्तार केला असून जिल्ह्यात एकूण ३२ शाखा असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली आहे. जळगाव, भुसावळ, वरणगाव, रावेर, फत्तेपूर, जामनेर, पाचोरा, नगरदेवळा, चोपडा, गोलाणी मार्केट, चाळीसगाव आणि धरणगाव यांसह विविध ठिकाणी संस्थेची स्वमालकीची शाखा कार्यालये कार्यरत आहेत.

जिल्ह्यात संस्थेची ७ स्वमालकीची गोदामे असून त्यांची एकत्रित क्षमता सुमारे ४ लाख ५० हजार पोत्यांची आहे. तसेच जळगाव व भुसावळ येथे २ स्वमालकीची शीतगृहे असून त्यांची क्षमता सुमारे १ लाख ५० हजार पोत्यांची असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.

५११ कोटींच्या ठेवी; ४५८ कोटींचे कर्ज

जळगाव जिल्ह्यात संस्थेच्या एकूण ५११ कोटी रुपयांच्या ठेवी असून सुमारे ४५८ कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाले आहे. यामध्ये सोनेतारण कर्ज ३२१ कोटी असून ३५ कोटी वेअरहाऊस तारण कर्ज आहे.शेतकरी व व्यापाऱ्यांना धान्य साठवणुकीसाठी वेअरहाऊसच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

४८२ शाखा, ४६२ गोदामांचे व्यापक जाळे

बुलडाणा अर्बनच्या एकूण संस्थात्मक विस्तारात ४८२ शाखा आणि ४६२ गोदामे असल्याचे संस्थेतर्फे नमूद करण्यात आले आहे. संस्थेच्या एकूण ठेवी १६,१७७ कोटी रुपये, एकूण कर्ज ११,७९५ कोटी रुपये, सभासद संख्या १६ लाख ५ हजार ८४१, सोनेतारण कर्ज ५,६७२ कोटी रुपये आणि वेअरहाऊस तारण कर्ज ४४० कोटी रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आर्थिक व्यवहारांसोबत सामाजिक बांधिलकी

बुलडाणा अर्बनकडून आर्थिक व्यवहारांसोबतच विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे संस्थेने नमूद केले आहे. तिरुपती बालाजी, माहूरगड, शिर्डी, तुळजापूर, अयोध्या आणि पंढरपूर येथे भक्तनिवास सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बुलडाणा येथील सहकार विद्या मंदिरात सीबीएसई पॅटर्न निवासी शाळेसह संस्थेच्या विविध ठिकाणी २६ शाळा इंग्रजी माध्यमाच्या असून एकूण ३० हजार विद्यार्थी शाळांमधून शिक्षण घेत आहेत.

याशिवाय सभासदांच्या पाल्यांसाठी पुणे व बुलडाणा येथे वसतिगृह सुविधा, बुलडाणा व मोर्शी येथे गो-रक्षण धाम, बुलडाणा येथे वेद विद्यालय, महामार्गांवर रुग्णवाहिका सेवा तसेच स्वर्गरथ सेवा,बीओटी तत्वावर महामार्गाचे बांधकाम (मलकापूर ते चिखली) अशा विविध सामाजिक उपक्रमांचा संस्थेच्या कार्यात समावेश आहे. 

शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी विविध कर्ज सुविधा

सोनेतारण कर्ज, वेअरहाऊस पावती तारण कर्ज, एलआयसी तारण कर्ज तसेच लॉकर सुविधा यांसारख्या विविध सेवा संस्थेच्या शाखांमधून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. वेअरहाऊस सुविधेमुळे शेतकरी व व्यापाऱ्यांना विविध प्रकारचे धान्य व कृषीमाल सुरक्षितपणे साठवता येत असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.

“केवळ अर्थ व्यवहारच नव्हे, तर सामाजिक बांधिलकीसुद्धा” या भावनेतून बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेच्या स्वमालकीच्या वास्तूत होणाऱ्या स्थलांतर सोहळ्यास नागरिक, सभासद, ग्राहक आणि हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बुलडाणा अर्बन परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Tumblr
Team Lok Bharti Live

Related Posts

भुसावळच्या राजकारणाला नवे वळण प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी, भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. गायत्रीताई भंगाळे यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

September 3, 2026

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार

September 3, 2026

बुलढाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या भव्य व दिमाखदार वास्तूत स्थलानंतर

August 26, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.