Close Menu
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Lok Bharti Live
Button
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Home»जळगाव»नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!
जळगाव

नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवडीनंतर गिरीश भाऊ महाजन यांचे जळगावात जल्लोषात स्वागत!

Team Lok Bharti LiveBy Team Lok Bharti LiveAugust 21, 2026Updated:August 21, 2026No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

जळगाव : राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे नेते ना. गिरीश भाऊ महाजन यांची नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर जळगाव शहरात प्रथम आगमन होताच त्यांचे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या वतीने प्रचंड उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले.

 रेल्वे स्थानक परिसरात गिरीश भाऊंच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. गिरीश भाऊंचे आगमन होताच घोषणांनी परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांचा उत्साह, पुष्पवृष्टी आणि जल्लोषामुळे रेल्वे स्थानक परिसर अक्षरशः उत्सवस्थळ बनला होता.

यावेळी जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते गिरीश भाऊ महाजन यांना भव्य गुलाबहार घालून नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही पुष्पगुच्छ देत गिरीश भाऊंना शुभेच्छा दिल्या.

 जिल्ह्याच्या राजकीय आणि विकासात्मक वाटचालीत गिरीश भाऊ महाजन यांचे नेतृत्व सातत्याने महत्त्वपूर्ण राहिले आहे. जळगाव जिल्ह्यासोबतच आता नाशिकसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण होते. “गिरीश भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं”, “भारतीय जनता पार्टीचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

यावेळी भाजप पश्चिम महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, भाजप गटनेते प्रकाश बालाणी, नगरसेवक ॲड. शुचिता हाडा, अरविंद देशमुख, सुरेखा तायडे, गायत्री राणे, विशाल भोळे, राजेंद्र घुगे पाटील, महानगर सचिव विशाल त्रिपाठी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गिरीश भाऊंवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाशिकच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जळगावात झालेल्या या भव्य स्वागताने गिरीश भाऊ महाजन यांच्यावरील कार्यकर्त्यांचे प्रेम आणि विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला. रेल्वे स्थानकावरील उत्स्फूर्त गर्दी, घोषणांचा गजर आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे गिरीश भाऊंचे जळगावातील आगमन संस्मरणीय ठरले.

Share. WhatsApp Facebook Twitter Tumblr
Team Lok Bharti Live

Related Posts

प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना; गणपती विसर्जनापूर्वी दोन पंपहाऊस सुरू करण्याचे आदेश

August 12, 2026

टाळ-मृदुंगाच्या गजरात श्रीसंत नामदेव महाराजांचा ६७७ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न

August 12, 2026

नशामुक्त युवा विकसित भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वयाने काम करावे : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

August 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.