स्वातंत्र्यसेनानी धनाजी नाना चौधरी यांची 73 व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन पर कार्यक्रम संपन्न..
जळगाव दिनांक 29 डिसेंबर 2025, धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित, लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगाव येथे स्वातंत्र्य सेनानी कर्मयोगी धनाजी नाना चौधरी यांची 73 व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम संपन्न झाला. अभिवादन पर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून, भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालय, चोपडा. येथील प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदणकर, प्रा. डॉ. आशिष गुजराथी, पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील प्रा. डॉ. भरत खंडागळे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या समाजकार्य अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष *प्रा. डॉ. विनोद रायपुरे,* लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगाव येथील प्रा. डॉ. यशवंत महाजन, शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रविंद्र लडे इ. मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ शाम सोनवणे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रस्ताविकेतून सांगितले की, ब्रिटिश प्रशासनात फौजदार पदावर कार्यरत असताना, त्यांनी त्या पदाचा राजीनामा देऊन, देश सेवेत स्वतःला समर्पण करून घेतले. महात्मा गांधीजींनी काँग्रेसच्या ग्रामीण अधिवेशनाचे घोषणा करत असताना, कर्मयोगी धनाजी नानाचे कार्य डोळ्यासमोर ठेवून, खिरोदा आणि फैजपूर परिसरात पहिले ग्रामीण अधिवेशन भरवले. कार्याध्यक्ष म्हणून कर्मयोगी धनाजी नानावर जबाबदारी सोपवली, जी त्यांनी अतिशय उल्लेखनीय रित्या पूर्ण करून दाखवली. असे अनेक उदाहरणं देऊन कर्मयोगी धनाजी नानांच्या कार्याची माहिती उपस्थितांना सांगितली. प्राचार्य डॉ ईश्वर सौंदणकर व प्रा. डॉ. यशवंत महाजन यांनी कर्मयोगी धनाजी नाना चौधरी यांच्या प्रतिमेस माल्याअर्पण केले. धनाजी नाना चौधरी प्रबोधनी संचलित, लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगाव आणि शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय, जळगाव येथील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिवादन पर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन प्रा. डॉ. शाम सोनवणे यांनी केले.
