ऋणानुबंध वधू–वर पालक परिचय मेळावा समिती नियोजन बैठक उत्साहात
सर्व शाखीय सोनार समाज बांधवांच्या सक्रिय सहकार्याने महाराष्ट्र सुवर्णकार सेना, जळगाव जिल्हा – जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाराऋ णानुबंध वधू–वर पालक परिचय मेळावा

दि. 18 जानेवारी 2026 रोजी भव्य, नियोजनबद्ध व ऐतिहासिक स्वरूपात संपन्न होणार आहे.या महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाच्या दृष्टीने जळगाव येथे अत्यंत महत्त्वाची नियोजन बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
या बैठकीस सर्व पदाधिकारी, नियोजन समिती सदस्य तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.या प्रसंगी पुढील विविध समित्यांची रचना करण्यात आली सुरक्षा समिती,संपर्क समिती

संगणक,नावनोंदणी,समितीपार्किंग व्यवस्था, समिती,स्वच्छता समिती,सूत्रसंचालन समिती,भोजन समिती,पाणी वाटप समिती,स्टेजव्यवस्था समिती,बॅच वाटप समिती,पुस्तिका नियोजन समितीआदरातिथ्य समिती,सुशोभीकरण समितीकुंडली–गुणमिलन समिती या सर्व समित्यांचे सुयोग्य, नियोजनबद्ध व परिणामकारक व्यवस्थापन निश्चित करण्यात आले.यावर्षीच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहणार असून,संपूर्ण मेळाव्याचे आयोजन नियम, नियोजन, नियंत्रण या त्रिसूत्रीचा अवलंब करून काटेकोरपणे राबविण्यात येणार आहे.

बैठकीदरम्यान उपस्थित बंधु–भगिनींनी अनेक उत्कृष्ट, विधायक व प्रेरणादायी सूचना मांडल्या असून,त्या सर्व सूचना यंदाच्या मेळाव्यात प्रत्यक्ष अंमलात आणण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.