स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित “पाडवा पहाट” या कार्यक्रमाचे सालाबाद प्रमाणे आयोजन करण्यात आलेले आहे.

बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पहाट गेली २३ वर्षे प्रतिष्ठान साजरी करीत आलेले आहे. यंदाचे हे २४ वे वर्ष आहे. ही प्रात:कालिन मैफल ठीक ६ वाजता महात्मा गांधी उद्यानात आयोजित करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी राष्ट्रीय कीर्तनकार, अनेक संगीत नाटकांमध्ये गायकांची भूमिका सादर करणारे प्रख्यात गायक पंडित चारुदत्त आफळे हे यंदाचे कलाकार असून त्यांना तबल्याची संगत रामकृष्ण करंबेळकर ऑर्गन ची संगत राहुल गोळे तर व्हायोलिनची संगत प्रमोद जांभेकर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी कै. नथ्थू शेट चांदसरकर ट्रस्ट तसेच भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशन चे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मा. खासदार स्मिताताई वाघ , मा. आमदार राजूमामा भोळे, अशोकभाऊ जैन व मेजर नानासाहेब वाणी यांची राहणार आहे. चुकवू नये अश्या या पहाटेच्या मैफिलीत तमाम जळगावकर रसिकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन प्रतिष्ठान ने केले आहे.
