Close Menu
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Lok Bharti Live
Button
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Home»जळगाव»बायोकॅमिस्ट्री विभागात ‘ताण व्यवस्थापन’ वर प्रेरणादायी मार्गदर्शन
जळगाव

बायोकॅमिस्ट्री विभागात ‘ताण व्यवस्थापन’ वर प्रेरणादायी मार्गदर्शन

Team Lok Bharti LiveBy Team Lok Bharti LiveSeptember 9, 2025Updated:October 11, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

बायोकॅमिस्ट्री विभागात ‘ताण व्यवस्थापन’ वर प्रेरणादायी मार्गदर्शन

जळगाव – केसीई सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव येथील बायोकॅमिस्ट्री विभागाच्या वतीने पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी “ताण तणाव व्यवस्थापन” या विषयावर एक विशेष अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात चेतना व्यसनमुक्ती केंद्र, जळगाव चे संचालक डॉ. नितीन विसपुते हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. मृणालिनी फडणवीस, शैक्षणिक संचालक, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी, जळगाव या होत्या. कार्यक्रमाचे संचालन व सूत्रसंचालन डॉ. उमेश वाघ यांनी केले.

डॉ. विसपुते यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाढणाऱ्या मानसिक ताणाचे कारण, परिणाम आणि प्रतिबंध यावर सखोल व अनुभवसिद्ध मार्गदर्शन केले. त्यांनी श्वसन तंत्र, ध्यानधारणा, वेळेचे नियोजन, शारीरिक व्यायाम, तसेच सकारात्मक विचारसरणी यासारख्या विविध ताणमुक्तीच्या उपाययोजना विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. तसंच भावनिक समज, आत्मपरीक्षण आणि दैनंदिन जीवनात समतोल राखणे यांचे महत्त्व अधोरेखित केले.

या उपक्रमाला बायोकॅमिस्ट्री विभागातील ६४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रम अतिशय संवादात्मक आणि प्रभावी ठरला. विद्यार्थ्यांनी डॉ. विसपुते यांच्याशी प्रश्नोत्तरांद्वारे संवाद साधत आपल्या शंकांचे समाधान केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बायोकॅमिस्ट्री विभागाचे प्रमुख डॉ. भूषण कविमंडन, तसेच विभागातील प्राध्यापक डॉ. सुरेश कांबळे, डॉ. किशोर पाटील आणि डॉ. विपुल फालक यांचे विशेष योगदान लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा उपयोग करून मानसिक ताण कमी करण्याचा व अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार व्यक्त केला. बायोकॅमिस्ट्री विभागाच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले.

Share. WhatsApp Facebook Twitter Tumblr
Team Lok Bharti Live

Related Posts

ऋणानुबंध वधू–वर पालक परिचय मेळावा समिती नियोजन बैठक उत्साहात

January 1, 2026

स्वातंत्र्यसेनानी धनाजी नाना चौधरी यांची 73 व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

December 29, 2025

मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक प्रचार सभे साठी मंत्री पंकजा ताई मुंडे यांची सभा

November 30, 2025
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.