स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा कुमार उज्वल गवळीची राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड

जळगांव- क्रीडा युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक ,जिल्हा परिषद नाशिक, यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय विभाग स्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले होते यात खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या 19 वर्षाखालील उज्वल ललित गवळी यांनी सहभाग घेऊन त्यामध्ये कास्यपदक प्राप्त केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालीराज्यस्तरीय स्पर्धा 26 ऑक्टोबर ते 28 सप्टेंबर 2050 नागपूर येथे होणार आहेत.उज्वल ललित गवळी या खेळाडूंला क्रीडाशिक्षक डॉ. रणजीत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कुमार उज्वल गवळी यांचे संस्थाध्यक्ष प्रज्ञावंत आदरणीय श्री. नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ. एस.एन.भारंबे,उपप्राचार्य श्री. आर.बी.ठाकरे,पर्यवेक्षिका प्रा. सौ. स्वाती बऱ्हाटे,समन्वयक प्रा.श्री.उमेश पाटील, जिमखाना समिती प्रमुख प्रा.सौ.शोभना कावळे यांनी अभिनंदन केले आहे.
