जळगाव- केसीई सोसायटी संचलित ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात 2004 या शैक्षणिक वर्षाच्या बॅचच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला भेट दिली.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. विद्यार्थ्यांनी शाळेत आल्यानंतर वीस एकवीस वर्षांपूर्वी शाळेत आपण कसे होतो, किती मस्ती करायचो, शिक्षकांच्या हातचा किती मार खायचो, या सर्व आठवणी जाग्या केल्या. सर्वात महत्त्वाचे आलेले सर्व विद्यार्थी शाळेचे वर्गातले बॅकबेंचर्स होते पण आज त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने यशस्वी होते.पुण्याच्या येरवडा जेलमध्ये पी.एस.आय जेलर बनलेल्या परविन तडवी या विद्यार्थिनीने शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. रूपाली ओगले मुंबईला शिक्षिका असणारी रूपाली शिंदे,साडेचारशे मुलांना डबा पुरवणारी मेस चालवणारी कविता पाटील या विद्यार्थिनींना शाळेत आल्याबद्दल आणि शाळेच्या आठवणी जागवल्याबद्दल खूप आनंद झाला.भूषण भोई, अभिषेक राणे, कैलास बैरागी, स्वप्नील कुमावत रवींद्र गवळे, सचिन सपकाळे वासुदेव बडगुजर ,अतुल घुले सुनील सपकाळे, विपिन वाघ हे सर्व विद्यार्थी आज कोणाची नोकरी, कोणाचा बिझिनेस असे विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.शाळेची शिपाई दादा अनिल शिंदे आणि चंदन खरे यांच्या बद्दलचे अनुभव सुद्धा विद्यार्थ्यांनी सांगितलेया माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.
