धनाजी नाना विद्या प्रबोधनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या विषयावर मार्गदर्शन:

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयामध्ये दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास विभाग व महीला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पुनम दुसाने उपस्थित होत्या. त्यांनी मुलींना विवाहानंतर नवीन कुटुंबात जाताना स्वतःच्या आरोग्याची तसेच कुटुंबाची काळजी घेण्याची जाणीव करून दिली. हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य ठेवणे, पीसीयूडीबाबत जागरूक राहणे व आईशी संवाद साधून मदत घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्तन कर्करोग व गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबाबतही मेमोग्राफी टेस्ट करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे या सुद्धा त्यांनी सविस्तरपणे विद्यार्थ्यांना सांगितल्या युवतींनी शारीरिक स्वच्छता, लैंगिक शिक्षण, पाळी संदर्भातील माहिती, वेळेवर झोप, अभ्यासाचे नियोजन, घरचे सकस व ताजे जेवण घेणे या बाबींमध्ये जागरूक राहावे असे त्यांनी मार्गदर्शन केले. पॅकेज्ड खाद्यपदार्थ टाळण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला
.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांनी भूषविले. त्यांनी आपल्या मनोगतात स्त्रिया स्वतःच्या आजाराकडे व आरोग्याकडे दुर्लक्ष करून मुलं व कुटुंबाला अग्रक्रम देतात, परंतु महिलांनी स्वतःच्या आरोग्याची जपणूक करणे अत्यंत गरजेचे आहे, असे सांगितले.या कार्यक्रमासाठी एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. भारती गायकवाड, विद्यार्थी विकास विभागाच्या महिला कार्यक्रम अधिकारी व महिला मंचच्या प्रमुख प्रा. डॉ. सुनिता चौधरी, डॉ. कल्पना भारंबे व सहायक ग्रंथपाल सौ. गायत्री अत्तरदे उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सुनिता चौधरी यांनी केले.