Close Menu
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Lok Bharti Live
Button
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Home»जळगाव»इन्फोसिसच्या १५ दिवसांच्या विद्यार्थी विकास कार्यक्रमाचा प्रमाणपत्र वितरण समारंभ 
जळगाव

इन्फोसिसच्या १५ दिवसांच्या विद्यार्थी विकास कार्यक्रमाचा प्रमाणपत्र वितरण समारंभ 

Team Lok Bharti LiveBy Team Lok Bharti LiveOctober 1, 2025Updated:October 1, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

केसीई संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये, इन्फोसिसच्या १५ दिवसांच्या विद्यार्थी विकास कार्यक्रमाचा प्रमाणपत्र वितरण समारंभ

जळगाव- खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजमेंट एंड रिसर्च मध्ये इन्फोसिस कंपनी तर्फे १५ दिवसांची स्कील डेव्हेलपमेंटवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा १६ जून ते २ जुलै दरम्यान घेण्यात आली. ह्या कार्यशाळेत एमसीए, बीसीए आणि आयएमसीएच्या ७० विद्यार्थ्यांनी ट्रेनिंग पूर्ण केली. ह्यात पहिल्या १२ दिवसांसाठी मुंबईच्या मास्टर ट्रेनर जुतिका दास ह्या स्कील डेव्हेलपमेंट, कम्युनिकेशन स्किल्स, इंटरव्ह्यू स्किल्स, कॉर्पोरेट कल्चर, व्यक्तिमत्व विकास, इंग्लिश डेव्हेलपमेंट आणि रेज्युमे रायटिंगवर ट्रेनिंग दिली. त्यानंतर नागपूरचे विनोद रंगारी हे एप्टीट्यूड टेस्ट, लॉजिकल रीजनिंग, क्यूटी, मैथ्स आणि बैंकिंग एक्झाम वर कार्यशाळा घेतली. ही ट्रेनिंग कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे निशुल्क होती. आयएमआरमध्ये इन्फोसिस द्वारे संपन्न झालेली ही पाचवी कार्यशाळा होती. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर प्रत्येक विद्यार्थ्याला इन्फोसिसतर्फे कार्यशाळा संपन्नतेचे प्रमाणपत्र आणि एप्टीट्यूड व इंग्रजी-डेव्हेलपमेंटची पुस्तके देण्यात आली.

याप्रसंगी संचालक प्रा डॉ. बी.व्ही. पवार सरांनी विद्यार्थ्यांना या कौशल्याधिष्ठीत ज्ञानाचा उपयोग करिअरच्या विकासासाठी कसा करावा यासाठी मार्गदर्शन केले आहे. प्रा पवार सरांनी आनंद व्यक केला की केसीई संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विद्यार्थ्यांची ही इन्फोसिस प्रायोजित प्रशिक्षणार्थीची पाचवी बॅच प्रशिक्षित होऊन बाहेर पडत आहे. यातुनच आपले विद्यार्थी औद्योगिक आणि आयटी क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी सज्ज होतात. आणि आपले करीयर उत्तम रीत्या घडवतात याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.

ह्यावेळी आयएमआरचे संचालक डॉ. बी.व्ही. पवार, डीन-स्कूल ऑफ कम्प्युटर सायन्स प्रा. एस.एम.खान, प्रा. उदय चतुर, प्रा. प्रकाश बारी, डॉ. दिपाली किरंगे, प्रा. अंकिता तिवारी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन आणि ह्या कार्यशाळेचे संयोजन ट्रेनिंग एंड प्लेसमेंट हेड प्रा. पुनीत शर्मा ह्यांनी केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Tumblr
Team Lok Bharti Live

Related Posts

स्व. वसंतराव चांदोरकर स्मुर्ती प्रतिष्ठान आयोजित 24पाडवा पहाट

October 22, 2025

नवीन जिल्हाधकारी यांच स्वागत आणि मावळते जिल्हाधिकारी यांना निरोप

October 20, 2025

हजारो दिव्यांनी उजळले चिमुकले राम मंदिर परिसर

October 20, 2025
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.