सुमारे तीन हजार गणेश भक्तांनी केले धारा प्रवाही गणपती अथर्वशिर्षाचे पठण
गणपती अर्थवशीर्ष ही गणपतीची सर्वोच्च स्तुती, अथर्व मुनीनीं रचलेली संस्कृत रचना आहे. गणपतकच्या या उच्च कोटीच्या सेवेत तीन हजार गणेश भक्तांनी धाराप्रवाही गणपती अथर्वशिर्षाचे पठणातून केली. रविवार, दि. ३१/०८/२०२५ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत सुभाष चौकाच्या मानाचा गणपती सन्मुख शास्त्रशुध्द व भक्तीमय वातावरणात हा उपक्रम संपन्न झाला. तीन हजार अथर्वशिर्ष मुखोदग असलेल्या गणेश भक्तंनी एका स्वरात धारा प्रवाहीत लागोपाठ २१ आवर्तने म्हणुन पन्नास हजार पेक्षा अधिक सामुहिक आवर्तने झाली. याप्रसंगी सुभाष चौक खचाखच भरले होते.
सुभाष चौक मित्र मंडळ, सुभाष चौक नागरी पतसंस्था जळगांव व श्री स्वामी समर्थ केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाचे प्रतिवर्षी मोठे होत जाणारे स्वरुपास भक्तीच्या दिशेने नेणेकरीता या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुरवातीस कार्यक्रमाचे प्रमुख आचार्य पंडीत महेशकुमार त्रिपाठी यांनी गणपती अथर्वशिर्षाचे महात्म्य कथन केले. श्री गणेश विद्येचे देवता असुन पहिली ते उच्चशिक्षणा पर्यंत विद्यार्थ्यांनी गणेशाची आराधना करावी. गणपतीचे कृपेने विद्यार्थ्यांची शैक्षणीक गुणवत्ता वाढीस लागते, सुसंस्कारीत भावी पिढी निर्माण होते असे त्यांनी म्हटल.
हजारों भक्तांच्याच्या मुखातुन गणपती अथर्वशीर्ष पठणाचे स्वर वातावरणात मिश्रीत होवुन निर्माण होणाऱ्या ऊर्जेतून राष्ट्र समृधी, जळगांव शहरात व जिह्यात शांतता रहावी, समृध्दी, सुबत्ता, एकोपा नांदावा राष्ट्रोन्नतीत कोणतेही विघ्न येवु नये हा संकल्प गणेश भक्तांनी घेतला.
सुभाष चौकात सावली करीता मांडव टाकण्यात आले होते. परीसर स्वच्छ करून वातावरण निर्मिती करीता परीसरात आंब्याची तोरणे, झेडुंच्या फुलांच्या माळा, भगवे ध्वज व गोमुत्र शिंपडुन पवित्रता आणली होती. भाविकांकरीता बिछायत, प्रसाद वाटप, अष्ठगंध टिळा, महीलांसाठी हळदी-कुंकु, अथर्वशीर्ष पुस्तीका वाटप, पादत्राणा करीता दोन विशेष स्टाॅल लावण्यात आले होते. शंभर पेक्षा जास्त कार्यकर्त्यांद्वारे अत्यंत नियोजन पुर्वक कार्यक्रम यशस्वी करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरवातीस शंखनाद, ओंकार ध्वनी, गणपती पुजन, शांती पाठ व अथर्वशीर्षचे अथर्व महात्म्य कथन होवुन सामुहीक अथर्वशीर्षचे लागोपाठ २१ आर्वतने म्हटली गेली. यावेळी गणपतीवर दुग्धाभिषेक व दुर्वाभिषेक करण्यात आले याप्रसंगी अभिषेकातुन पावन झालेली गणपतीचे १०१ चांदीचे शिक्के भाविकांना लकी ड्रॉ द्वारा क्रमांक काढुन गणेश भक्तांना भेट देण्यात आली.
गणपती अथर्वशीर्षातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेद्वारे प्रसन्नतेच्या वातावरणात निश्चितच परीसराचे, सर्व गणेश भक्तांचे आणि संपुर्ण जगाचे कल्याण होवोत अशी प्रार्थना केली.दुग्धाभिषेक महेश दायमा तर दुर्वाभिषेक गोपाल पाटील या दांम्पत्यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता श्रीकांत खटोड, मनिष अग्रवाल, प्रविण बांगर, हरिष चव्हाण, संजय पांडे, अलोक अग्रवाल, नरेंद्र कापडणे,पंकज गव्हाळे, प्रमोद भामरे, अमीत कासार व पतसंस्थेचे कर्मचारी आदि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
अशी माहितीसंजय गांधी कार्यक्रम प्रमुख सुभाष चौक पतसंस्था, जळगाव यांनी दिली.
