Close Menu
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Lok Bharti Live
Button
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Home»जळगाव»अशोक जैन यांचा श्री महावीरसहकारी बँक तर्फे सन्मान
जळगाव

अशोक जैन यांचा श्री महावीरसहकारी बँक तर्फे सन्मान

Team Lok Bharti LiveBy Team Lok Bharti LiveSeptember 29, 2025Updated:September 29, 2025No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

श्री महावीर सहकारी बँकतर्फे अशोक जैन यांचा सन्मान

अशोक जैन यांचा सम्मानाप्रसंगी (डावीकडून) सागर पगारिया, अशोककुमार खिवसरा, जयवंतराव देशमुख, दलिचंद जैन, सुरेशदादा जैन, राजेंद्र मयूर, सुभाष लोढा
अशोक जैन यांचा सम्मानाप्रसंगी (डावीकडून) सागर पगारिया, अशोककुमार खिवसरा, जयवंतराव देशमुख, दलिचंद जैन, सुरेशदादा जैन, राजेंद्र मयूर, सुभाष लोढा

 

 

 

बँकेची २७ वी सर्वसाधारण सभा रोटरी भवन मध्ये संपन्न.

जळगाव दि. २८ प्रतिनिधी- श्री महावीर सहकारी बँक लि. ची २७ वी सर्वसाधारण सभा रोटरी भवन येथे संपन्न झाली. यावेळी भागधारक, ठेवीदार व संचालक मंडळाच्या वतीने जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. मुंबई येथील चक्र व्हिजन इंडिया फाऊंडेशनच्या वतीने ‘विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन्स पीस अवार्ड’ देऊन अशोक जैन यांचा नुकताच सन्मान झाला. २०२५-२६ या वर्षाकरिता शेती, शेतकरी आणि समाज उपयोगी कार्यासाठी हा गौरव असून गतवर्षी टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. या पार्श्वभुमीवर श्री सहकारी महावीर बँकेने जळगावचे भुमिपूत्र जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांचा विशेष सन्मान केला.

माजी मंत्री सुरेशदादा जैन, बँकेचे चेअरमन दलिचंद जैन, माजी संचालक राजेंद्र मयूर यांच्या उपस्थितीत हा सम्मान सोहळा झाला. याप्रसंगी व्यासपीठावर व्हा. चेअरमन जयवंतराव देशमुख, संचालक सुभाष लोढा, अशोककुमार खिवसरा, जितेंद्र कोठारी, शांतीलाल बिनायक्या, अजय राखेचा, श्रेयस कुमट, सागर पगारिया, गुणवंत टोंगळे, दिपीका चांदोरकर, स्विकृत संचालक आर. जे. पवार, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर पाटील, कर्मचारी प्रतिनिधी बिना मल्हारा, अॅड. जितेंद्र जैन यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन सभेची सुरवात झाली. सुरेशदादा जैन, राजेंद्र मयूर व अशोक जैन यांचा सत्कार बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 

बँकेच्या सभासदांची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दलिचंद जैन यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न झाली. सभेपुढे १३ विषय ठेवण्यात आले होते. त्यात लाभांशाचे मंजूरी, मागील वर्षी झालेल्या सभेतील इतिवृत्त वाचुन कायम करण्यात आला. ३१ मार्च २५ पर्यंत संपलेल्या आर्थिक वर्षाचा संचालक मंडळाचा अहवाल स्वीकृत केला गेला. लेखापरिक्षीत ताळेबंद व नफा तोटा पत्रक, वैधानिक लेखापरिक्षकाची नेमणूक, लेखापरिक्षकाने सादर केलेला २४-२५ चा अहवाल, शासनाच्या एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत तडजोड केलेल्या कर्ज खात्यांची नोंद अशा विषयांवर चर्चा करुन सर्वच्या सर्व विषय मंजूर करण्यात आले. आयत्या वेळेवर आलेल्या सुचनांवर चर्चा करुन त्यावर अध्यक्षांच्या मान्यतेतून काम करण्याचे आश्वासन देण्यात आले. यामध्ये कन्य जन्मोत्सव योजनेतून मिळणारे निधीची दुप्पट वाढ करण्याची घोषणा अध्यक्षांनी केली.

 

सहकारी बँकांचे विकास अधिकारी के. सी. बाविस्कर यांनी सभासदांचे प्रशिक्षण केले. त्यात त्यांनी कर्ज, ठेव, शेअर्स बाबत सभासदांचे कर्तव्यांसह जबाबदारीची जाणिव करुन दिली. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी बँकेच्या सुरवात ही भवरलाल जैन, डॉ. डी. आर. मेहता, दलुभाऊ यांच्या संकल्पनेतून झाली. आज बँक लोकांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी काम करत आहे. अशोक जैन हे सामाजीक उत्कर्षासह शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यात कार्य करतात, त्यांच्या प्रयत्नातून सामाजिक सेवा घडत असून ‘विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन्स पीस अॅवार्ड’ हे त्याचेच प्रतिक असल्याचे सुरेशदादा जैन म्हणाले.

मान्यवरांच्या हस्ते सभासदांच्या पाल्यांचा गौरव करण्यात आला. इयत्ता १० वी रोशनी नन्नवरे, रिक्षीत भारुळे, कुशल जैन, नमन पाटील, सुहानी कुलकर्णी तर १२ वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या रोहनी पाटील, युगेंद्र सोनार, नारायण पाटील, मृदूला पाटील, तसेच पदवी मध्ये विशेष प्राविण्या प्राप्त केलेल्या शुभांगी भागवत, स्नेहील पाटील, कृणाल जैन, महिमा जैन, मिनल नेहते, दुर्गेश विसपूते या विद्यार्थ्यांचा संचालक मंडळाच्या वतीने गौरव करण्यात आला.

अजय राखेचा यांनी मानपत्राचे वाचन व सूत्रसंचालन केले. सुभाष लोढा यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने समारोप झाला.

Share. WhatsApp Facebook Twitter Tumblr
Team Lok Bharti Live

Related Posts

स्व. वसंतराव चांदोरकर स्मुर्ती प्रतिष्ठान आयोजित 24पाडवा पहाट

October 22, 2025

नवीन जिल्हाधकारी यांच स्वागत आणि मावळते जिल्हाधिकारी यांना निरोप

October 20, 2025

हजारो दिव्यांनी उजळले चिमुकले राम मंदिर परिसर

October 20, 2025
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.