जळगाव – येत्या वर्षभरात खेलो इंडिया स्कूल गेम्सच्या माध्यमातून योगा खेळ स्पर्धेला सुरवात होऊन शालेय विद्यार्थ्यांकरिता १२ प्रकारात योग खेळ सुरु होतील आणि ऑलम्पिक मध्ये मोठ्या संख्येने मेडल भारताला मिळतील असे आश्वासक प्रतिपादन योगासन भारतचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (अधिकार प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाचे सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी, एकलव्य क्रीडा संकुल आणि जळगाव डिस्ट्रिक्ट योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) खेलो इंडिया आणि योगासन भारत अंतर्गत ‘अस्मिता जळगाव जिल्हास्तरीय योगासन सिटी लीग २०२५- २६’ च्या उद्घाटन प्रसंगी मूळजी जेठा महाविद्यालय परिसरातील कान्ह कला मंदिर नवीन ऑडिटोरियम हॉल मध्ये केले.यावेळी आमदार सुरेश भोळे ,अध्यक्षस्थानी अॅड. प्रवीणचंद्र जंगले (सहसचिव खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी), योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष सतीश मोहगावकर, केसीई सोसायटी शैक्षणिक संचालक डॉ. मृणालिनी फडणवीस,प्राचार्य प्रा.सं. ना. भारंबे व डॉ देवानंद सोनार उपस्थित होते.आ.सुरेश भोळे यांनी आपल्या भाषणात योग आपल्याला त्याग,समर्पण शिकवतो आणि हि आपल्या जीवन जगण्याची उत्कृष्ट कला आहे. सनातन धर्म आम्हाला सांगतो जो सकाळी सूर्योदयापूर्वी उठतो तो चांगल्या व्हिजन असणाऱ्या लोकांचे लक्षण आहे असे नमूद केले.ही स्पर्धा १० पेक्षा अधिक आणि १८ वर्षे पूर्ण तसेच १८ पेक्षा अधिक आणि ५५ वर्ष पूर्ण अशा दोन वयोगटांमध्ये मुली आणि महिलांसाठी आयोजित करण्यात आली. स्पर्धेत सहभागी मुली आणि महिलांना योगासन भारत द्वारा निर्देशित पाच आवश्यक योगासने आणि दोन ऐच्छिक आसने सादर केली. यावेळी जिल्हाभरातून २५० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.यांचे परीक्षण करण्यासाठी २५ परीक्षक आणि सोहम योग विभागाचे सहकारी उपस्थित होते.सदर स्पर्धेचे लाईव्ह प्रसारण अस्मिता पोर्टलच्या युट्युब वरून केले गेले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत अॅड. प्रवीणचंद्र जंगले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.भाग्यश्री भलवतकर आभार आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार डॉ.देवानंद सोनार यांनी केले. केसीई सोसायटी व्यवस्थापन मंडळ सदस्य प्राचार्य अशोक राणे,प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर तसेच केसीई सोसायटी संचलित विविध शालेय मुख्याध्यापक व महाविद्यालय प्राचार्य,प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा.पंकज खाजबागे,डॉ.ज्योती वाघ,डॉ.श्रद्धा व्यास,डॉ.शरयू विसपुते,डॉ.प्रीती पाटील,शुभम पाटील,साहिल तडवी ,राहुल खरात,अमोल देशमुख,सचिन कोल्हे,भूषण पाटील,डॉ.विशाल भारुड,डॉ.सहदेव जाधव यांचे सहकार्य मिळाले.
