- गुरुवर्य प. वि .पाटील विद्यालयात रंगला दांडिया रास
जळगाव-केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे नवरात्रोत्सवानिमित्त दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक , उपशिक्षिका कल्पना तायडे , योगेश भालेराव यांच्या हस्ते महालक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर अशा वेशभूषा करून दांडिया रास मध्ये भाग घेऊन नवरात्रोत्सवाचा आनंद लुटला. प्रसंगी काही विद्यार्थिनींनी नवदुर्गाची वेशभूषा धारण केली.कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक सूर्यकांत पाटील , भावना धांडे , सीमा गोडसे यांनी केले तर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.