- के सी ई इंजिनीरिंग (स्वायत्त ) महाविद्यालयांत माहितीचा अधिकार दिन

जळगाव-खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत माहितीचा अधिकार दिवस करण्यात आला . कार्यक्रमाचे वेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांनी केंद्र व राज्य शासनाने माहिती अधिकार केव्हा सुरु केले या बद्दल माहिती दिली माहिती अधिकार दिन हा दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो, जो जागतिक स्तरावर माहितीच्या सार्वत्रिक प्रवेशासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवसाच्या निमित्ताने, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने माहितीच्या प्रवेशाचे महत्त्व ओळखून, लोकांना सरकारी कामांची माहिती मिळवण्याचा हक्क आहे यावर जोर दिला जातो. भारतात हा कायदा, २००५ मध्ये लागू झाला, ज्यामुळे नागरिक सरकारकडून माहिती मागू शकतात आणि या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दरवर्षी २८ सप्टेंबर हा दिवस ‘माहिती अधिकार दिन’ म्हणून साजरा केला जातो .तर महाविद्यालयाचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन प्रा गणेश पाटील यांनी जागरूकता वाढवणे,पारदर्शकता,नागरिकांना अधिकार,भ्रष्टाचार रोखणे माहितीच्या अधिकाराचा उपयोग भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आणि गैरव्यवहार उघड करण्यासाठी केला जातो.यावर भर दिला. कार्यक्रमाचे प्रसंगी प्राध्यापक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते.