Close Menu
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Lok Bharti Live
Button
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Lok Bharti Live
  • Home
  • राज्य-राष्ट्रीय
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
Home»सामाजिक»10ऋणानुबंध वधु-वर-पालक परिचय मेळावा 18 जानेवारी२०२६. रोजी होणार
सामाजिक

10ऋणानुबंध वधु-वर-पालक परिचय मेळावा 18 जानेवारी२०२६. रोजी होणार

Team Lok Bharti LiveBy Team Lok Bharti LiveSeptember 15, 2025Updated:October 11, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

जळगाव – महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव, जिल्हा जळगाव यांच्या वतीने 10 वा ऋणानुबंध वधु-वर-पालक परिचय मेळावा, १८ जानेवारी २०२६ रोजी आयोजन आदित्य लॉन.एम.आय.डि.सी लोकमत कार्या लाय जवळ जळगाव  येथे  होणार. त्या बाबतची जळगाव येथील सोनार समाज बांधवांची मीटिंग येथे पार पडली. मीटिंग च्या अध्यक्ष स्थानी मा. श्री. राजेंद्र रामदासशेठ बिरारी हे होते.प्रसंगी उपस्थित समाज बांधवांनी अनेक सूचना मांडल्या. सर्व सूचनांवर विचार करून पुढील नियोजन करू अशी ग्वाही महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव, जिल्हा जळगाव चे अध्यक्ष श्री. संजय विसपुते यांनी दिली.मेळावा नियोजन अतिशय सूत्रबद्ध पद्धतीनं व्हावा यासाठी मेळावा नियोजन समिती जाहीर करण्यात आली.

 

ऋणानुबंध २०२६ वधु-वर-पालक परिचय मेळावा कार्यकारिणी –

श्री. रमेश धुडकूशेठ वाघ – मेळावा स्वागत अध्यक्ष.श्री.सुभाष अशोकशेठ सोनार- मेळावा प्रमुख.श्री.नितीन दिगंबरशेठ गंगापुरकर- मेळावा उप प्रमुख.श्री. शरदचंद्र रमेशशेठ रणधीर- मेळावा नियोजन समिती प्रमुख.श्री. प्रशांत त्र्यंबकशेठ विसपुते- मेळावा सचिव.श्री. दिलीप एकनाथशेठ पिंगळे- मेळावा सह सचिव.श्री.गोकुळ शंकरशेठ सोनार- मेळावा प्रसिद्धी प्रमुख.

 यावेळी नवीन मेळावा समिती पदाधिकाऱ्यांना उपस्थित सर्व समाज बांधवांनी शुभेछा दिल्या.मेळाव्याचे नियोजन कामी संलग्न समित्याचे गठन लवकरच करण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा जळगावचे उपाध्यक्ष श्री. विजय केशवराव वानखेडे यांनी दिली.श्री जगदीशशेठ देवरे, डॉ. विजय बागूल यांनी मेळाव्यात जास्तीत जास्त नियोजित वधु वरांनी नोंद करावी व मेळाव्यात मुलींनी उपस्थित राहावे अशी सूचना मांडली. त्याबद्दल सर्वांनी काळजी घ्यावी असे मत व्यक्त केले.प्रसंगी समाजातील विविध संघटनेचे पदाधिकारी, समाजबांधव, उपस्थित होते. उपस्थित समाज बांधवांचे आभार सचिव संजय पगार यांनी मानले.

 

Share. WhatsApp Facebook Twitter Tumblr
Team Lok Bharti Live

Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.