मलकापूर येथे आयोजित “मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान २०२५” अंतर्गत “तालुकास्तरीय कार्यशाळा” कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित.

रावेर लोकसभाअंतर्गत मलकापूर येथे मलकापूर विधानसभा क्षेत्रमध्ये ग्रामविकास, ग्रामपंचायत व पंचायतराज सशक्तीकरण अंतर्गत पंचायत समिती, मलकापूर व पंचायत समिती, नांदुरायांच्या संयुक्त विद्यमाने “मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान २०२५”अंतर्गत “तालुकास्तरीय कार्यशाळा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री ना.श्री. संजयजी सावकारे व कामगार मंत्री ना.श्री.आकाशजी फुंडकरतर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मलकापूर विधानसभा आमदार श्री. चैनसुखजी संचेतीहे प्रमुख उपस्थितीत होते.

महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागमार्फत दि. १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये “सेवा पंधरवाडा”अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये “मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान”राबविण्याचा संकल्प केला आहे. त्यामध्ये ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व गावपातळीवरील कर्मचारी यांना विकास कार्याची माहीती देऊन ग्रामविकासात सर्वांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याकरीता एक दिवसीय कार्यशाळा आयोजीत करण्यात येत आहे.
अभियानाची वैशिष्ट्ये– विकसित महाराष्ट्र २०४७ करिता पचायत राज संस्था अधिक गतिमान करणे, ग्रामपंचायत मध्ये विकासाची निकोप स्पर्धा अभियानाचा कालावधी दिनांक १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ अभियान कालावधीत विविध योजनावी प्रभावी अंमलबजावणी करणे, ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना विविध सारावर एकूण १९०२ पुरस्कार, पुरस्कारांची एकूण रक्कम रुपये २४५.२० कोटी, अभियान कालावधी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी विकासाला लोक चळवळीचे स्वरूप देणे, राज्य स्तरावर प्रथम क्रमांक विजेत्या ग्रामपंचायातीस रु.५ कोटी, पंचायत समितीस रु.२ कोटी व जिल्हा परिषदेस रु.५ कोटी रक्कमेचे पारितोषिक देणार.यावेळी मलकापूर विधानसभा क्षेत्र अंतर्गत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच भाजपा जिल्हा व तालुका प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते स्थानिक अधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
