जळगावच्या मुलांना राज्य आट्यापाट्या स्पर्धेत विजेतेपद मुलीं तृतीय स्थानी

जळगाव : – महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाच्या वतीने खामगाव, जिल्हा बुलढाणा येथे नुकत्याच पार पडलेल्या ३२ व्या सब-ज्युनियर गट राज्य अजिंक्यपद आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेत जळगाव जिल्हा मुलांनी दिमाखदार कामगिरी करत विजेतेपद प्राप्त केले .अंतिम फेरीत त्यांनी यजमान बुलढाणा संघावर २-० सेट्सने मात करत विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत जळगाव संघाचा तन्मय डोळे याने संपुर्ण स्पर्धेत उत्कृष्ट आक्रमण व संरक्षणाची कामगिरी केल्याने त्यास स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
संघाचा कर्णधार निखिल पाटील, ओम गायकवाड अनमोल तेलंग यांनी प्रभावी खेळ करत प्रेक्षकांची मने जिंकली. या विजयासह जळगावने पाचव्यांदा राज्य विजेतेपद मिळविले आहे.ज
ळगाव मुलींच्या संघाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यांनीही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले.
विजयी मुलांचा संघ:
ओम गायकवाड, ध्रुव सोनार, निखिल पाटील (कर्णधार), तन्मय स्वप्निल , राहुल पाटील, आयुष हिरोळे, अनमोल तेलंग, श्रीपाद पाठक, केतन काथार, जयेश ओतारी, आदित्य वानखेडे, पुष्कर चौधरी, प्रवीण पाटील, कल्पेश पाटील, प्रणील पाटील, प्रशिक्षक: स्वप्निल महाजन, संघ व्यवस्थापक: देवेश पाटीलमुलींचा संघ (तृतीय क्रमांक विजेता):रोहिणी धांडे, गुणवंती पाटील, नूतन पाटील, जान्हवी सोनवणे, अमृता पवार, प्रणाली राजपूत, शिवन्या मडावी, रिया पवार, रितिका कंगटे, रितिका महाजन, भूमिका भदाणे, योगिनी शिंदे, सेजल गुजर, देवयानी चौधरी, वैष्णवी पाटील, प्रशिक्षक: रोहित नवले, संघ व्यवस्थापक: नेहा कंगटे, सहाय्यक संघ व्यवस्थापक: वैष्णवी पाटील.या यशाबद्दल जळगाव जिल्हा आट्यापाट्या संघटनेचे अध्यक्ष आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार सौ. लताताई सोनवणे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. रविंद्र नाईक, डॉ. प्रदीप तळवेलकर, डॉ. अमृताताई सोनवणे, डॉ. गौरव दादा सोनवणे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री. विशाल फिरके,विजय न्हावी अँड. अक्षय टेमकर ,श्री. लीलाधर पाटील, मुख्याध्यापक श्री. आर.पी. खोडपे, दोघा संघाचे क्रिडामार्गदर्शक क्रीडा शिक्षक श्री. अनिल माकडे यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
