मू. जे. महाविद्यालात युवती सभेचे उद्घाटन

जळगाव- केसी ई सोसायटी संचलित मू. जे. महाविद्यालयात युवती सभेचे उद्घाटन दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमा अंतर्गत, विद्यार्थिनींचे आरोग्य व समस्या लक्षात घेऊन योग व ध्यान प्रशिक्षण देण्यात आले.युवती सभेचे उद्घाटन के. सी. ई. संस्थेच्या शैक्षणिक संचालिका डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून वाणिज्य शाखेच्या उप-प्राचार्य डॉ. सुरेखा पालवे, युवती सभेच्या अध्यक्षा डॉ. स्वप्नाली वाघुळदे, योग मार्गदर्शक म्हणून डॉ. देवानंद सोनार व डॉ. ज्योती वाघ आदी उपस्थित होते.साधारण वार्षिक पातळीवर युवती सभेंतअंतर्गत आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांचा आढावा युवती समिती अध्यक्षा यांनी दिला. डॉ. फडणवीस यांनी युवतींना शिक्षण व करियर घडविताना योग आणि आरोग्य यांचे महत्व सांगितले व युवती सभेच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. डॉ. सुरेखा पालवे यांनी अध्यक्षीय भाषणातून शिक्षण व स्त्री-सबलीकरण याचा संदेश दिला. या नंतर योग मार्गदर्शकांनी प्रशिक्षण दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नीलम पाटील या विद्यार्थिनीने केले. तर आभार प्रदर्शन प्रा. देवेश्री सोनवणे यांनी केले. या कार्यक्रमाकरता सर्व समिती सदस्य प्रा. हेमलता पाटील, डॉ. योगिनी राजपूत, डॉ. कविता पाटील, डॉ. नयना पाटील, प्रा. सोनाली शर्मा, डॉ. प्रतिभा तिवारी आणि हरीश चौधरी यांचे सहकार्य लाभले.
