- स्व.सौ.कांताबाई भवरलाजी जैन यांच्या पुण्यस्मरणार्थ शतकवीर रक्तदाते मुकुंद गोसावी यांचे स्वयंस्फूर्त रक्तदान
पितृपक्षात रक्तदान पुण्यदाई कार्य

ब्रँडॲम्बेसेडर मुकुंद गोसावी जळगाव — पितृपक्षात रक्तदान पुण्यदाई कार्य असून आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ जीवनदानाच्या या पावन कार्यात सहभाग घ्यावा असे आवाहन आरोग्य विभाग रक्तदान जनजागृती कार्याचे ब्रँड ॲम्बेसेडर मुकुंद गोसावी यांनी केले. आपल्या शारीरिक व्यंगाला न जुमानता शतकवीर रक्तदाते मुकुंद गोसावी यांनी आज नुकतेच वंदनीय मातोश्री कांताबाई भवरलाजी जैन यांच्या पुण्य स्मरणार्थ जैन प्लास्टिक पार्क बांभोरी येथे शासकीय रक्तकेंद्राच्या शिबिरात स्वयंस्फूर्त रक्तदान केले .गंभीर,अपघातग्रस्त,रक्तक्षय तसेच प्रसूतीस्तव येणाऱ्या महिला,थैलेसीमिया, हीमोफीलिया, सिकलसेल असलेले आदी रुग्ण यांना नियमित सुरळीत रक्तपुरवठा आवश्यक असतो तो फक्त आपल्या रक्तदानानाने पूर्ण होऊ शकतो.साधारण पन्नास किलो वजन व अठरा वर्षांवरील कुणीही निरोगी व्यक्ती सहज रक्तदान करू शकतात,रक्तदान करण्याने कुठली कमजोरी येत नसून विशेष आराम तथा खाण्यासाठी जे आपण नियमित खातो ते साधे अन्नही पुरेसे आहे.मी गेल्या तीन वर्षांपासून या सेवेत असून अद्यापही मला कुठलाही आजार वा त्रास नाही रक्तदाने नेहमी स्फूर्ती आणि आनंद असतो. पितृपक्षात पितृऋणार्थ(एक रक्तदान अपने पूर्वजो के नाम) रक्तदान सेवा पुण्यदाई कार्य असून मी सहभाग घेतला आपणही घेऊ शकता.

